शालेय विद्याथी वाहतुक संघाचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:39+5:302020-12-15T04:30:39+5:30
न्याय्य मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : कोरोना संकटामुळे झालेल्या विद्यार्थीं वाहतुकदारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंबानगरी शालेय ...
न्याय्य मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : कोरोना संकटामुळे झालेल्या विद्यार्थीं वाहतुकदारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंबानगरी शालेय विद्यार्थी वाहतूक संस्था व शालेय विद्याथी वाहतूक संघाच्यावतीने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमारे विविध न्याय्य मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांत विद्याथी वाहतुकदारांसाठी कल्याणकारी मंडळ किंवा बोर्ड स्थापन करण्यात यावे, स्कूल बस बंद असल्यामुळे परिवहन विभागाच्या सर्व करांमध्ये शंभर टक्के माफी द्यावी, विद्याथी वाहतूक व्यवसाय बंद असल्यामुळे चालक, मालक आणि अटेंडन्स यांना आर्थिक मदत मिळाली. कोरोना कालावधीमध्ये ज़्या वाहनांचे इन्सुरंस काढलेले आहे. त्यांना पुढे तेवढाच कालावधी वाढवून द्यावा यासह अन्य मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष बंडू कथिलकर, सचिव देवेंद्र बोंडे, रवींद्र गु्ल्हाने, चंद्रशेखर जाधव, सनील राऊत आदींसह शालेय वाहतुक संघाचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते.