पोलिसांनी राणा समर्थकांना हनुमान चालिसा पठणाची परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:07 AM2023-07-10T11:07:49+5:302023-07-10T11:10:52+5:30

अमरावतीत पोस्टरबाजीवरून राजकारण तापलं

Uddhav thackeray amravati visit : Ravi Rana's supporters denied permission to recite Hanuman Chalisa | पोलिसांनी राणा समर्थकांना हनुमान चालिसा पठणाची परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध

पोलिसांनी राणा समर्थकांना हनुमान चालिसा पठणाची परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध

googlenewsNext

अमरावतीउबाठा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून आज (दि. १०) त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यांच्या आगमनापुर्वीच रविवारी शहरात राण-ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचे पाहायला मिळाले. तर आज हनुमान चालिसा पठणाची मागणी राणा समर्थकांनी केली. पण ती मागणी पोलिसांनी फेटाळून लावली आहे.

आज उद्धव ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर असून येथील विश्रामगृहात ते दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे शहरात पोस्टर वॉरनंतर राणा समर्थकांनी हनुमान चालिसा पठणाची तयारी केली पण पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तरीही हनुमान चालिसा पठण करण्यावर समर्थक ठाम असल्याचे दिसले. हे पाहता पोलिसांनी कारवाई सुरू केली असून गर्ल्स हायस्कूल चौकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. तसेच, रवी राणांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. 

भेटीआधी यशोमती ठाकूर यांची राणा दाम्पत्यावर टीका

उद्धव ठाकरे अमरावतीत दाखल झाले असता काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर ठाकरे यांच्या भेटीला विश्रामगृहाकडे रवाना झाल्या आहेत. स्वागताची अमरावतीची परंपरा आहे त्यामुळे आम्ही स्वागतासाठी आलो आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, पोस्टर वॉरबाबत बोलताना त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका करत हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले. यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निवडणुका लवकर घेण्याची आमची मागणी असल्याचे सांगत निवडणुकीत कोणाची ताकद किती ते दाखवून देऊ असे आव्हानही ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

Web Title: Uddhav thackeray amravati visit : Ravi Rana's supporters denied permission to recite Hanuman Chalisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.