"उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे", भाजप आमदार नितेश राणेंचे टीकास्त्र

By गणेश वासनिक | Published: October 13, 2022 04:32 PM2022-10-13T16:32:45+5:302022-10-13T17:16:22+5:30

हिंदूंना कुठल्याही पद्धतीचे आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका; 'मविआ'चं सरकार गेलयं - नितेश राणे

Uddhav Thackeray is a finished man; Bjp Mla Nitesh Rane attacks on Shiv Sena chief | "उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे", भाजप आमदार नितेश राणेंचे टीकास्त्र

"उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे", भाजप आमदार नितेश राणेंचे टीकास्त्र

Next

अमरावती :उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे. राजकीय, सामाजिकदृष्ट्या शून्य झाला आहे. शिवसेनेचे काय झाले? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल न बाेललेले बरे असा हल्लाबाेल करीत भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली.

आमदार नितेश राणे हे गुरुवारी अमरावती येथे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे काय करतात, त्याच्या मागे चिंतन आहे. खरे तर उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे त्याच्यावर जास्त कशाला बोलायचं आज चांगला दिवस आहे, कशाला तोंड उगाच कडू करता, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली. 



राज्यात हिंदुत्ववादी सरकार 

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि धुळ्यात ईदच्या जुलूस मध्ये आक्षेपार्ह नारे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विषयी भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अशी नाटक आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असेल तर शांततेत साजरे करा, हिंदूंना कुठल्याही पद्धतीचे आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नाही, नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाही, अस्लम शेख मंत्री नाही आणि त्यातही प्रामुख्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. त्यामुळे जे सगळे असे नाटके करत असतील त्यांना पोलीस शोधून काढतील आणि परत त्यांच्या तोंडातून अशा घोषणा निघणार नाही व परत यांची जीभ अशी वळवणार नाही, याची काळजी आमचे सरकार घेईल, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Uddhav Thackeray is a finished man; Bjp Mla Nitesh Rane attacks on Shiv Sena chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.