यूजीसी नेट आता ३०० गुणांची; 'जेआरएफ'ना सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:38 AM2018-01-27T11:38:48+5:302018-01-27T11:41:50+5:30

UGC Net now has 300 points; Suit to 'JRF' | यूजीसी नेट आता ३०० गुणांची; 'जेआरएफ'ना सूट

यूजीसी नेट आता ३०० गुणांची; 'जेआरएफ'ना सूट

Next
ठळक मुद्देवयाची अट शिथिल८ जुलै रोजी होणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी वयाची अटही दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे.
याबाबतचे परीपत्रक सीबीएसईने जारी केले असून, नव्या नियमांनुसार ८ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा वेबसाइटवर १ फेब्रुवारीला होणार आहे.

असे असेल परीक्षेचे स्वरूप
नेट परीक्षेत सीबीएसईकडून काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा आता ३५० ऐवजी ३०० गुणांची असणार आहे. पूर्वी असणाऱ्या तीनऐवजी आता दोनच पेपर राहतील. पहिला पेपर ५० प्रश्नांचा व दुसरा पेपर १०० प्रश्नांचा आहे. परीक्षेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. १०० गुणांच्या (५० प्रश्न) पहिल्या पेपरसाठी एक तासाचा अवधी असणार आहे. २०० गुणांच्या (१०० प्रश्न) दुसऱ्या पेपरसाठी दोनच तास वेळ असणार आहे.

असा असेल नेट परीक्षेचा कार्यक्रम
सीबीएसईच्या नव्या नियमानुसार यूजीसी नेट परीक्षा ८ जुलै रोजी होणार आहे. ६ मार्च ते ५ एप्रिल आॅनलाइन फॉर्म भरता येईल. ६ एप्रिल रोजी चलान भरण्याची अंतिम मुदत राहील.

‘जेआरएफ’साठी वयाच्या अटीत वाढ
ज्युनिअर रिसर्च फेलोसाठी पूर्वीच्या खुल्या गटासाठी असलेली २८ वर्षे वयाची मर्यादा ३० वर्षे करण्यात आली आहे. मागास प्रवर्गांसाठी पाच वर्षे अधिक असणार आहेत.

Web Title: UGC Net now has 300 points; Suit to 'JRF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा