उमा, पिंळशेडा, शिवण प्रकल्पामध्ये निम्म्यापेक्षाही कमी जलसाठा; अनेक गावात ओढवणार जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 06:13 PM2021-07-30T18:13:53+5:302021-07-30T18:14:16+5:30

तालुक्यातील महत्वपूर्ण व पिण्याच्या पाण्याठी वापण्यात येत असलेला उमा प्रकल्पावर लंघापुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत

Uma, Pinlsheda, less than half the water storage in the sewing project; Water crisis will hit many villages | उमा, पिंळशेडा, शिवण प्रकल्पामध्ये निम्म्यापेक्षाही कमी जलसाठा; अनेक गावात ओढवणार जलसंकट

उमा, पिंळशेडा, शिवण प्रकल्पामध्ये निम्म्यापेक्षाही कमी जलसाठा; अनेक गावात ओढवणार जलसंकट

Next

- संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने महत्वाचा असलेल्या उमा प्रकल्पासह पिंळशेडा, शिवण या लघुप्रकल्पातही निम्म्यापेक्षा कमी जलसाठा आहे गतवर्षी हे प्रकल्प निम्म्यापेक्षा अधिक भरले होते, यावर्षी शिवण लघु प्रकल्पात कमी जलसाठा असल्याची माहिती आहे.

तालुक्यातील महत्वपूर्ण व पिण्याच्या पाण्याठी वापण्यात येत असलेला उमा प्रकल्पावर लंघापुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत गतवर्षी हा प्रकल्प पिंपळशेंडा लघु प्रकल्प बऱ्यापैकी भरल्याने पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. ११.६८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उमा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या लंघापुर ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत ५७ खेड्यांसाठी ०.७० दशलक्ष घनमीटर जलसाठा राखीव ठेवण्यात येतो.

तर २२४१ हेक्टर शेती सिंचनासाठी ६ ते ७ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव आहे. परंतू यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या प्रकल्पात केवळ २३. ११ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. अशीच स्थिती कायम राहीली तर भविष्यात मोठ्या प्रमाणात या तालुक्यावर जलसंकट ओढविण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आता उपलब्ध असलेल्या जसाठ्यातुन  बाष्पीभवन वगळून केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकेल, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे अशक्यप्राय होईल.

उमा प्रकल्पामध्ये आजचा २३.११ टक्के, उपलब्ध आहे. शिवण आणि पिंपळशेंडा लघु प्रकल्पातून पाण्याचा केवळ शेती सिंचनासाठी उपयोग होतो परंतु अंत्यत कमी जलसाठा उपलब्ध असल्याने परीसरातील रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याने पिक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमी पाऊस झाल्याने धरणे भरली नसल्याने भविष्यात तालुक्यातील बागायती शेती व रब्बी हंगामात यापाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात येणार असून तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे हे निश्चित.
 

Web Title: Uma, Pinlsheda, less than half the water storage in the sewing project; Water crisis will hit many villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.