प्रसुतीचा खर्च मिळेना, महिलेने टेबलावर आणून ठेवले बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:38+5:30
प्रिती अनंत कडू असे सहा महिन्यांचे बाळ आणून सोडणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ही महिला वसतिगृहात कार्यरत आहे. पुणे येथील ब्रिक्स इंडिया कंपनीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचा करार झाला आहे. प्रिती कडू यांना प्रसूती रजा पूर्ण झाल्यानंतर परत कामावर रूजू होताना नियमानुसार प्रसुतीचा खर्च कार्यालयाकडे मागितला असता भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नसल्याने पैसे मिळणार नाही, असे पीएफ कार्यालयातून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतगिृहात एका कंत्राटी महिला कामगारांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून प्रसुतीचा खर्च मिळत नसल्याने तिने त्रस्त होऊन गुरुवारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर सहा महिन्यांचे बाळ आणून सोडले. हा प्रकार प्रादेशिक उपायुक्तांच्या दालनात घडला. यावेळी शिवसेनेनेही धडक देत याबाबत जाब विचारला.
प्रिती अनंत कडू असे सहा महिन्यांचे बाळ आणून सोडणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ही महिला वसतिगृहात कार्यरत आहे. पुणे येथील ब्रिक्स इंडिया कंपनीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचा करार झाला आहे. प्रिती कडू यांना प्रसूती रजा पूर्ण झाल्यानंतर परत कामावर रूजू होताना नियमानुसार प्रसुतीचा खर्च कार्यालयाकडे मागितला असता भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नसल्याने पैसे मिळणार नाही, असे पीएफ कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, कंत्राटदार आणि समाजकल्याण विभागातून पैसे भरण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. हेडसांड आणि पैशासाठी येरझारा मारुन त्रस्त या महिला कामगारांनी चक्क टेबलवर सहा महिन्यांचे बाळ आणून सोडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे, गोपाळ राणे, वैभव मोहकर, विजय काकडे, अक्षन्न चºहाटे उपस्थित होते. प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी कंत्राटदार कंपनीचे देयके ही पुणे येथून काढली जातात, असे त्यांनी सांगितले.