अनधिकृत बोअरवर धाड तहसीलदाराशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:28 AM2019-06-16T01:28:47+5:302019-06-16T01:29:30+5:30

ड्राय झोनमधील सावरखेड शिवारात होत असलेल्या अनधिकृत बोअरवर धाड घालून तेथील काम थांबविणाऱ्या तहसीलदारांना शासकीय कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला. १३ जून रोजी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली.

On the unauthorized boar, the tahsildar of the forage | अनधिकृत बोअरवर धाड तहसीलदाराशी हुज्जत

अनधिकृत बोअरवर धाड तहसीलदाराशी हुज्जत

Next
ठळक मुद्देसावरखेड येथील घटना । सात जणांविरुद्ध गुन्हा, दोन मशीन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : ड्राय झोनमधील सावरखेड शिवारात होत असलेल्या अनधिकृत बोअरवर धाड घालून तेथील काम थांबविणाऱ्या तहसीलदारांना शासकीय कामकाज करण्यास मज्जाव करण्यात आला. १३ जून रोजी रात्री ११.५० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तहसीलदार गणेश माळी यांच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांकडून सात जणांविरुद्ध भादंविचे कलम १८८, ३५३, व महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन २००९ मधील सहकलम ५२(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींमध्ये राजेश खेरडे (रा. अंबाडा, ता. मोर्शी), पांढºया रंगाच्या विनाक्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा चालक, चारचाकी वाहनातील एक अनोळखी इसम, केए ४० एम ३८९१ क्रमांकाच्या बोअर मशीनचा चालक चिनातंबी, केए ४० / ९३०९ क्रमांकाच्या बोअर मशीनचा आरमुगम तसेच दोन्ही वाहनांच्या मालकांचा समावेश आहे.
सावरखेड हे गाव अतिशोषित (ड्राय झोन) असल्याने तेथे बोअर करण्यास मनाई आहे. तहसील प्रशासनाचा मनाई हुकूम डावलून सावरखेड येथे कमलसिंह चितोडिया यांच्या घराच्या मागे असलेल्या गट क्रमांक ६६९ या शेतात विनापरवाना अवैधरीत्या बोअर सुरू असल्याची माहिती मोर्शीचे तहसीलदार गणेश माळी यांना मिळाली. त्यानुसार ते पथकासह १३ जूनला रात्री ११.३० च्या आसपास सावरखेड येथे पोहोचले. तेथून बोअर करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन वाहने जप्त करून त्यांनी चौकशी आरंभली.
शिवारात दाखल झालेल्या केए ४० एम ३८९१ क्रमांकाच्या बोअर मशीनचा चालक चिनातंबी, केए ४० / ९३०९ क्रमांकाच्या बोअर मशीनचा चालक आरमुगम यांच्याकडे त्यांनी बोअर करण्याबाबतच्या परवान्याची विचारणा केली. दोघांकडेही बोअर करण्याबाबतचा वैध परवाना आढळून न आल्याने दोन्ही बोअर मशीन जप्त करण्यात आल्या.
वाहनचालकांना ती वाहने मोर्शी तहसील कार्यालयात नेण्याची सूचना देऊन तहसीलदार आपल्या वाहनात बसून शिवाराबाहेर पडले. त्यानंतर त्यांना अडविण्यात आले. याप्रकरणी तहसीलदार माळी यांनी पहाटे पाचच्या सुमारास तक्रार दाखल केली. या घटनेची चर्चा महसूल मंडळात गाजत असून, माफियाच्या शिरजोरीबाबत चिंता व्यक्त होत आहे.

घटनाक्रम
जप्त केलेली दोन्ही वाहने शेताबाहेर येताच विनाक्रमांकाच्या चारचाकी वाहनातून तीन इसम आले. त्यांनी त्यांचे वाहन बोअर मशीनच्या आडवे लावले. तहसीलदार गणेश माळी यांच्याशी हुज्जत घालत आरोपी राजेश खेरडे याने पंचनाम्याच्या प्रती आत्ताच द्या, गाड्या माझ्या मालकीच्या असून, त्या तुम्हाला नेऊ देणार नाही, काय करायचे आहे ते करा, असे बजावले. आरोपी खेरडे हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सुरू असलेली बोअर वाहने बंद करुन बळजबरीने वाहनचालक व कामगारांना शिवारातून बाहेर पाठविले. आरोपीस अटकाव केल्यानंतरही त्याने बळाचा वापर करीत तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांशी हुज्जत घातली आणि सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा घटनाक्रम पुढे आला आहे.

Web Title: On the unauthorized boar, the tahsildar of the forage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.