शहरात ठिकठिकाणी अनधिकृत ‘स्मोकिंग झोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:45 PM2017-08-23T22:45:09+5:302017-08-23T22:46:05+5:30
शहरात ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत स्मोकिंग झोन तयार झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत स्मोकिंग झोन तयार झाले आहेत. येथे बिनदिक्कत वावरणाºया ‘अॅक्टिव्ह स्मोकर्स’मुळे ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चा घातक विळखा परिसरात वावरणाºया आबालवृद्धांना घेरू लागला आहे. तंबाखूमुळे निर्माण होणारा अत्यंत विषारी वायू धूम्रपान करणाºया इतर नागरिकांद्वारे सोडल्या जाणाºया धुरावाटे इतरांच्या फुफ्फुसात शिरत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
शहरात अनेक पानटपºया, चहा कॅन्टिन्स व हॉटेलमध्ये विशिष्ट जागा ‘स्मोकिंग झोन’म्हणून तयार केली जात आहे.
पॅसिव्ह स्मोकिंग घातकच
याठिकाणी तरूण मुले राजरोरसपणे धुम्रपान करतात. तसेच विविध ब्रांडच्या सिगारेटी विकत घेऊन बेभानपणे ओढल्या जातात. सिगारेटच्या धुराबरोबर बाहेर पडणारा कार्बनडाय आॅक्साईड व टॉक्झिन वायुमुळे येथे वावरणाºया अन्य नागरिकांना विनाकारण त्रास होतो. यातूनच अनेक आजार उद्भवतात. सिगारेटमध्ये घातक निकोटीन असल्याने सिगारेट ओढणाºयासोबतच त्या धुराच्या कक्षेत येणाºया लोकांच्या फुफ्फुसालाही धोका संभवतो. त्यामुळे अशा अनाधिकृत स्मोकिंग झोनवर कारवाई अपेक्षित आहेत.
राज्यात गुटखाबंदी असतानाही ‘स्मोकिंग झोन’मध्ये अवैध गुटखाविक्री सुद्धा सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनाधिकृत ‘स्मोकिंग झोन’वर संबंधितांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात बुधवारी लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’केले असता. मुधोळकर पेठेतील एका हॉटेलमध्ये असे अनधिकृत ‘स्मोकिंग झोन’ आढळून आले. यासाठी परवाना आहे का, अशी विचारणा केली असता हॉटेल चालकाची बोलती बंद झाली होती. येथे राजरोस धूम्रपान करणाºया तरूणाला हटकले असता, त्याने ‘येथे सिगारेट नाही ओढायची तर कुठे ओढायची’ असा प्रतिप्रश्न केला.
शहरात अनेक अनाधिकृत ‘स्मोकिंग झोन’
शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठ, इर्विन चौक अंबापेठ, पंचवटी चौक व शेगाव नाका परिसरात ठिकठिकाणी अनधिकृत स्मोकिंग झोन तयार केले आहे. या ठिकाणी तरूण नियमबाह्य स्मोकिंग करतात. यामुळे चहा घेण्यासाठी येणाºया नागरिकांना नाहक ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ला सामोरे जावे लागत आहे.
बेजाबदार प्रशासनामुळे ‘स्मोकिंग झोन’फोफावले
धुम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो, अशी धोक्याची सूचना देणाºया जाहिराती प्रसार माध्यमांवरून प्रसारित केल्या जातात. सिगारेटच्या पाकिटावरसुद्धा तसा धोका अंकित केलेला असतो. धूम्रपानामुळे होणाºया हानीबाबत जनजागृती करण्यासाठी शासनही पुढाकार घेते. मात्र, प्रशासन याबाबतच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करीत नसल्याने स्मोकिंग झोन फोफावले आहेत.
महापालिकेकडूने कुठल्याही ‘स्मोकिंग झोन’ला परवानगी किंवा परवाना दिलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार निदर्शनास आल्यास आम्ही कारवाई करतो. शहरातील स्मोकिंग झोन अनाधिकृतच आहेत.
- हेमंतकुमार पवार,
आयुक्त, महापालिका
एखाद्या संस्थेच्या आवारात धूम्रपान करताना एखादी व्यक्ती आढळल्यास नियमानुसार त्या संस्थाप्रमुखांना २०० रूपये दंड आकारला जाईल. ही कारवाई करण्याचा अधिकार आहे.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक