बेनोडा येथे डिझेलचा अनधिकृत साठा, वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:26 AM2019-07-15T01:26:17+5:302019-07-15T01:26:37+5:30
तालुक्यातील बेनोडा येथे विक्रीच्या बेतात राहत्या घरात डिझेलचा अनधिकृत साठा ठेवलेल्या एका आरोपीस रविवारी अटक करण्यात आली. बेनोडा पोलिसांनी रविवारी दुपारी एका चारचाकी वाहन व २२५ लिटर डिझेल जप्त केले. सुनील नत्थुजी गोरले (४०, रा. बेनोडा) असे आरोपीचे नाव आहे.
वरुड : तालुक्यातील बेनोडा येथे विक्रीच्या बेतात राहत्या घरात डिझेलचा अनधिकृत साठा ठेवलेल्या एका आरोपीस रविवारी अटक करण्यात आली. बेनोडा पोलिसांनी रविवारी दुपारी एका चारचाकी वाहन व २२५ लिटर डिझेल जप्त केले. सुनील नत्थुजी गोरले (४०, रा. बेनोडा) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा स्वत:च्या घरात डिझेलचा बेकायदेशीरसाठा करून विक्री करीत असल्याच्या माहितीवरून ठाणेदार सुनील पाटील, जमादार दिवाकर वाघमारे, साहेबराव राजस, संतोष औंधकर, राजेश टेकाम, गजानन कडू, सचिन भोसले, संजय ठाकरे, विरखडे यांच्या पथकाने रामकृष्ण कॉलनीत धाडसत्रा दरम्यान ही कारवाई केली. यामध्ये घरातील एका ड्रम आणि तीन प्लास्टिक कॅनमध्ये २२५ लिटर डिझेल आढळून आला. १५,४०० रुपयांचे डिझेल व एमएच ३४ के ९४७ या क्रमांकाचे चारचाकी वाहन असा १,३५,४०० रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली.