शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:45+5:302021-05-09T04:13:45+5:30
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ मे रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु ...
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ मे रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात कोणत्याही ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय दिले आहे.
राज्य शासनाकडून विदर्भात २८ जूनपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अनिश्चितता आहे. दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिलला होणार होती. परंतु, कोरोनामुळे ती २३ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, आता २८ जूनपर्यंत परीक्षा घेणे शक्य होणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यासह मोठ्या प्रमाणात पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, आता कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शिष्यवृत्तीची परीक्षा होणार की, नाही याबाबत वरिष्ठस्तरावरून आदेश आलेले नाही. त्यामुळे शासनाचे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.