रेल्वेच्या धडकेत काका-पुतण्या ठार; तेलंगे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 08:49 AM2023-05-13T08:49:45+5:302023-05-13T08:50:14+5:30
धामणगाव शहरातील मध्यरात्रीची घटना
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : मध्यरात्री काका बाहेर गेल्याने त्यांना रेल्वे स्थानक परिसरात शोधण्यासाठी गेलेला पुतण्याही अचानक मागून आलेल्या रेल्वेच्या धडकेने दोघेही ठार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री ११.४५ वाजता शहरात घडली.
सुधाकर बन्सी तेलंगे (५५) व मंगेश नारायण तेलंगे (२८) रा. मोहम्मद पुरा अशी काका- पुतण्याची नावे आहेत, सुधाकर हा रात्री अचानक घरून निघून गेला त्याला शोधण्यासाठी मंगेश मागोमाग गेला, त्यावेळेस भुसावळ कडून नागपूरकडे जाणारी मालवाहतूक गाडी आली. या धडकेत हे दोघेही ठार झाले सुधाकर बांधकाम कामगार होता. त्याच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुली व दोन मुले असा परिवार आहे, तर अविवाहित असलेला मंगेश हा पेंटर काम करीत होता. त्याच्यामागे दिव्यांग वडील, वृद्ध आई ,मानसिक आजारी असलेली बहीण व तिला असलेल्या दोन मुलीचा सांभाळ करण्याचा भार एकुलत्या एक मंगेश होता रेल्वे पोलिसानी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहे.