आठवडी बाजार परिसरात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:10+5:302021-01-25T04:14:10+5:30
पक्ष्यांची पंख: प्लास्टिकचा खच अंजनगांव बारी : अमरावती तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या अंजनगाव बारी येथे दर गुरुवारी ...
पक्ष्यांची पंख: प्लास्टिकचा खच
अंजनगांव बारी : अमरावती तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या अंजनगाव बारी येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. सभोवतालच्या १२ ते १५ लहान-मोठ्या खेड्यांतील शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणात वस्तू व भाजीपाला येथे विक्रीसाठी आणतात. ग्रामपंचायतने तशी व्यवस्थाही केलेली आहे. मात्र, बाजार परिसराची स्वच्छता राखली जात नाही. ‘कोरोना अनलॉक’नंतर येथील बाजार पूर्ववत झाला असला तरी अस्वच्छता मात्र कायम आहे.
वैयक्तिक स्वच्छता व स्वयंशिस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे बाजार परिसरात सगळीकडे अस्वच्छता, कोंबडीचे पंख पसरले आहेत. बाजार परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेने थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्र व जनता उच्च व माध्यमिक विद्यालय असून, रुग्ण, विद्यार्थी व शिक्षकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजार परिसरातील कोंबडी मृतावस्थेत आढळली, अशी येथे ओरड आहे. त्यामुळे बर्ड फ्लू पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
-------------