अमरावतीत पाचच्या नोटांची अघोषित बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:20 PM2019-02-01T23:20:35+5:302019-02-01T23:21:41+5:30
शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आता गरजेचे आहे.
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे आता गरजेचे आहे.
केंद्र शासनाने पाचशे व हजाराची नोट चलनातून बांद केल्यानंतर देशभरातील नागरिक संभ्रमात पडले होते. त्यावेळी नागरिकांनी पाचशे व एक हजारांच्या सर्व नोटा बँकेत जमा केल्या. त्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. हळूहळू १०० व ५० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. मात्र, पाच, दहा व वीस रुपयांच्या जुन्याच नोटा ठेवण्यात आल्या. त्या नोटांबाबत नवीन नियमावली नसून, त्या आजही चलनात आहेत. गेल्या काही महिन्यांत अमरावतीत शहरातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी अचानक पाच रुपयांच्या नोटा स्वीकारणेच बंद करून टाकले आहे. हा प्रकार एका व्यापाºयाकडून दुसºया व्यापाºयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यापारी पाच रुपयांच्या नोटा स्वीकारतच नसल्याचे दिसून येत आहे. या अघोषित नोटबंदीमुळे शहरातील अनेकांकडे पाचच्या नोटांचा खच जमलेला आहे. पाचच्या नोटा स्वीकारणे बंद झाल्यामुळे शहरात चिल्लरचा तुटवडादेखील निर्माण झाला आहे. पाचची नोट घेऊन काही खरेदी करण्यासाठी गेल्यास, ती नोट चालत नसल्याचे थेट व्यापारी सांगत आहे. त्यामुळे अनेक जण पाचची नोट घेऊन या दुकानातून त्या दुकानात चकरा मारतानाही दिसत आहे. पाचची नोट खपविताना तर अनेकांचे व्यापाºयांशी वादसुद्धा झाले आहेत. त्यामुळे गोरगरिबांना तर पाचची नोट खर्च करण्याचा प्रश्नच पडला आहे. याशिवाय अमरावतीकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कायद्यातील तरतुदीत ज्या नोटा चलनात आहे, त्या नोटा स्वीकारणे प्रत्येकालाच बंधनकारक आहे. जर कोणीही चलनातील नोटा स्वीकारत नसेल, तर त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचा अधिकारी नागरिकांना आहे.
पाच रुपयांची नोट देऊ कुणाला?
माझे किरकोळ किराणा स्टोअर्स असल्याने सकाळी दूधविक्रीसह आवश्यक साहित्य खरेदीकरिता ग्राहक येतात. काहींनी दिलेल्या पाच रुपयांच्या नोटा मी इतर व्यापाऱ्यांना दिल्या असता, त्या स्वीकारल्या नाहीत. अद्याप माझ्याकडे १४ नोटा जमा झालेल्या असून, काही ग्राहक अद्यापही पाच रुपयांची नोट घेऊन येत असल्याने त्यांना समजावतो आहे. मात्र, शासनाने अधिकृतरीत्या पाच रुपयांच्या नोटा बंद झाल्याचे घोषित केलेले नसल्याने आम्ही स्वीकारतो तुम्हीही स्वीकारा ना, असे ते सांगतात. ग्राहकाला परत पाठवित राहिल्यास धंदा कसा होईल. त्यामुळे उधारी वाढू लागली आहे, असे गजानननगरातील एका किराणा व्यावसायिकांने सांगितले.
काय म्हणतो आरबीआयचा नियम?
रिझर्व्ह बॅक आॅफ इंडिया अॅक्टच्या करन्सी रेग्युलेशन अंतर्गत चलनातील नोटांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. चलनातील नोटा न स्वीकारणे हा आरबीआय अॅक्टनुसार गुन्हा ठरतो. चलनातील नोटा न स्वीकारणांºयाविरुद्ध कोणी तक्रार केल्यास कलम १८८ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
लोकमत प्रतिनिधीचा अनुभव
पाच रुपयांची नोट बंद झाली असल्याने आम्ही ती नोट घेत नसल्याचे अनेक व्यापारी वर्ग सांगत आहे. याचा थेट अनुभव घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी शहरातील काही व्यावसायिकांकडे वस्तू खरेदी करून पाचची नोट दिली असता, ती त्या व्यापाऱ्याने स्वीकारली नाही. यानंतर ‘लोकमत’ने अन्य व्यापाºयांकडे जाऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता, मती भ्रमित करणाराच अनुभव प्रतिनिधीला आला. उपाहारगृह, पानटपरी, किराणा दुकान, दूध विक्री केंद्र, भाजीपाल्याच्या हातगाड्या, फेरीवाले अशा दहा ते बारा जणांंना पाच रुपयांची देण्याचे प्रयत्न केला असता, त्यांनी ती नोट बंद झाल्याचे सांगून स्वीकारलीच नाही. या व्यापाऱ्यांना पाचची नोट सुरु असल्याची मुद्दामच जाणून करून दिली. मात्र, तरीही त्यांनी स्वीकारली नाही.
पाच रुपयांची नोट चलनात आहे. ती नोट बंद झाल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये असेल, तर तो त्वरित काढावा. ती नोट नागरिक व व्यापाºयांनी स्वीकारलीच पाहिजे.
- मुकेश दलाल
मुख्य व्यवस्थापक
आरबीओ, क्षेत्रीय कार्यालय
आरबीआयच्या नियमानुसार पाच रुपयांची नोट चलनात आहे. त्यामुळे ती नोट न स्वीकारणे तर्कसंगत नाही. अशा लोकांविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते. नोट स्वीकारली जात नसल्यास नागरिकांनी तक्रार करावी.
- यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त
आरबीआयच्या कायद्यातील तरतुदीनुसार पाच रुपये चलनात आहे. या चलनातील नोटा न स्वीकारणे म्हणजे आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन करणे होय. पाच रुपयांची नोट चलनात आहे. ती कोणी स्विकारत नसेल, तर तो गुन्हा ठरतो. याबाबत पोलीस तक्रार झाल्यास कलम १८८ नुसार कारवाई होई शकते.
- विश्वास वैद्य, विधी अधिकारी, पोलीस आयुक्तालय