चांदूर रेल्वे येथे गांधी जयंतीपर्यंत रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:40+5:302021-09-15T04:16:40+5:30

अन्यथा स्टेशन मास्तरांना कुलूप देणार भेट स्टेशन पूर्णत: बंद करून शहर आत्मनिर्भर करण्याची मागणी रेल्वे स्टेशन मास्तर मार्फत यांच्यामार्फत ...

Undo trains at Chandur Railway till Gandhi Jayanti | चांदूर रेल्वे येथे गांधी जयंतीपर्यंत रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या

चांदूर रेल्वे येथे गांधी जयंतीपर्यंत रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या

Next

अन्यथा स्टेशन मास्तरांना कुलूप देणार भेट

स्टेशन पूर्णत: बंद करून शहर आत्मनिर्भर करण्याची मागणी

रेल्वे स्टेशन मास्तर मार्फत यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांना निवेदन

अन्यथा स्टेशन मास्तरांना कुलूप देणार भेट : शहर आत्मनिर्भर करण्याची मागणी, रेल्वेमंत्र्यांना निवेदन

फोटो जी १४ चांदूर रेल्वे निवेदन

चांदूर रेल्वे : रेल्वे स्टेशनवर गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून असताना याकडे रेल्वे विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी मंगळवारी स्टेशन मास्तरमार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठविले. कोरोनाकाळात बंद झालेले रेल्वे स्टॉपेज पूर्ववत महात्मा गांधी जयंतीपर्यंत सुरू करावे, अन्यथा २ ऑक्टोबरला स्टेशन मास्तरांना कुलूप भेट देऊन स्टेशन बंद करण्याचा इशारा रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी दिला आहे.

चांदूर रेल्वे येथे थांबा दिल्यास हे शहर रेल्वे सुविधांपासून आत्मनिर्भर होणार असल्याचे रेल रोको कृती समितीने म्हटले. चांदूर रेल्वे स्टेशनवर लॉकडाऊनच्या पहिले विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा - अहमदाबाद एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा होता. मात्र, अनलॉकमध्ये सदर सर्व रेल्वेगाड्या सुरू झाले असताना केवळ विदर्भ एक्सप्रेसचा थांबा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या गाड्यांचा थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रकार चांदूर रेल्वेवासीयांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा, अन्यथा २ ऑक्टोबर रोजी स्टेशन पूर्णत: बंद करण्यासाठी स्टेशन मास्तरांना रेल रोको कृती समिती कुलूप भेट देणार आहे. जबलपूर एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस व नागपूर - अमरावती - भुसावल पॅसेंजर या रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देताना रेलरोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, सदस्य महेमुद हुसेन, विनोद जोशी, बंडू यादव, राजाभाऊ भैसे, रामदास कारमोरे, संजय डगवार, अजय चुने, पंकज गुडधे, अशोकसिंह ठाकुर, मुतालिक उपस्थित होते.

(बॉक्समध्ये घेणे)

खासदारांच्या नेतृत्वात शहर आत्मनिर्भर

चांदूर रेल्वे शहरातील स्टेशनवर कुलूप भेट देऊन स्टेशन बंदची मागणी केली. ही मागणी पूर्ण झाल्यास हा क्षण सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार की, खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे शहर रेल्वे सुविधांपासून आत्मनिर्भर झाला, असे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे.

140921\img-20210914-wa0038.jpg

photo

Web Title: Undo trains at Chandur Railway till Gandhi Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.