अंबानगरीत ज्ञानार्जन; राकेश कपूरची गरूडझेप
By admin | Published: January 25, 2016 12:27 AM2016-01-25T00:27:36+5:302016-01-25T00:27:36+5:30
मूळचे दिल्लीचे व अंबानगरीत शैक्षणिक धडे घेतलेल्या राकेश कपूर यांनी तंत्रज्ञाच्या युगात अॅण्ड्राईड मोबाईलवर उपलब्ध होणारे 'झामरू डॉट कॉम' या अॅपची निर्मिती करुन गरुडझेप घेतली आहे.
पत्रपरिषद : 'झामरू डॉट कॉम अॅप्स'ची निर्मिती
अमरावती : मूळचे दिल्लीचे व अंबानगरीत शैक्षणिक धडे घेतलेल्या राकेश कपूर यांनी तंत्रज्ञाच्या युगात अॅण्ड्राईड मोबाईलवर उपलब्ध होणारे 'झामरू डॉट कॉम' या अॅपची निर्मिती करुन गरुडझेप घेतली आहे.
मोबाईल युझरला व व्यावसायिकांना खरेदी विक्रीसंदर्भात महत्त्वाचे व्यवहार करताना मोठा फायदा होणार असल्याची माहिती इंजिनिअर राकेश कपूर यांनी श्रमिक भवन येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये दिली. सदर अॅप्स सेवा ही नि:शुल्क राहणार असून कुठलीही पोस्ट ६० सेंकदांत डाऊनलोड व अपलोड करता येणार आहे. तसेच वायफायमध्ये हाय स्पीड मिळणार आहे. पूर्वीच्या बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय व आताच्या राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात १९९१ च्या बॅचचे विद्यार्थी असलेले राकेश कपूर यांनी अभियांत्रिकी कॉम्प्युटर शाखेची डिग्री घेतली होती. झामरू डॉट कॉम या अॅपस्चे उद्घाटन बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सोमवारी करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला चंद्रकांत शिंदे, कृणाल दीक्षित, व्यंकटेश गर्ग, कपिल मिश्रा, संजय गर्ग, संजय निंद्रा, संदीप अपल, संजय देहराव आदी अभियंते उपस्थित होते. या अॅपस्च्या लांचिंगसाठी २५ वर्षांनंतर हे सर्व मित्र एकत्र आले, हे विशेष. (प्रतिनिधी)