गळ्यात सुरी खुपसून बेरोजगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:25 PM2018-09-22T23:25:12+5:302018-09-22T23:25:45+5:30
हॉटेलमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने गळ्यात सुरी खुपसून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गांधी चौकातील स्वादिस्ट भोजनालयात घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. अभिजित शरद इंगळे (३६,रा. गोदावरी कॉलनी, वर्धा) असे मृताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हॉटेलमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने गळ्यात सुरी खुपसून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गांधी चौकातील स्वादिस्ट भोजनालयात घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. अभिजित शरद इंगळे (३६,रा. गोदावरी कॉलनी, वर्धा) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, अभिजित इंगळे काही दिवसांपासून शहरातील विविध हॉटेलमध्ये जाऊन कामाचा शोध घेत होता. त्याने मामाजी, मराठा सावजीसह अन्य हॉटेलमध्ये चौकशी केली. कोणीही काम देत नसल्याचे पाहून तो निराश झाला. अशा मानसिक स्थितीत फिरत असताना अभिजित दोन दिवसांपूर्वी गांधी चौकातील दत्त पॅलेसच्या व्यापारी संकुलातील स्वादिस्ट भोजनालयात जेवण करायला गेला. तेथेही नोकरीची मागणी केली. मात्र, मालक अजय शिरभाते त्यावेळी उपस्थित नसल्यामुळे, त्याला पुन्हा येण्यास सांगितले गेले. बुधवारी अभिजित पुन्हा स्वादिस्ट भोजनालयात गेला. भोजनालय बंद असल्याचे पाहून तो संकुलाबाहेरील पायाºयावर बसला. आत झोपलेल्या नोकर मंगेश हरिदास केवदे (रा.गणोजा) याने सकाळी १० वाजता भोजनालयाचे शेटर उघडले. मंगेश तोंड धुऊन चहा पिण्यासाठी बाहेर गेला. १० मिनिटांनी तो भोजनालयात परतला असता, त्याला अभिजित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला दिसला. मंगेशने तत्काळ घटनेची माहिती मालकाला दिली. पोलिसांची सीआर वाहन घटनास्थळी पोहोचले. पोलीस कर्मचारी सुधीर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ पोलीस वाहनात अभिजितला टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी अभिजितला मृत घोषित केले. माहितीवरून पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड घटनास्थळी दाखल झाले. अभिजितचा मृतदेह शव विच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवला असून, त्याच्या मृत्युबाबत नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणाने गळ्यात सुरी खुपसून आत्महत्या केली. स्वादिस्ट भोजनालयासमोर ही घटना घडली. मृताच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.
- दिलीप पाटील,
पोलीस निरीक्षक, कोतवाली