‘पीसी टू एसपी’ गणवेशाचे एकसमान कापड; पोलीस अधीक्षकांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 07:15 PM2019-10-11T19:15:12+5:302019-10-11T19:15:42+5:30
जिल्हा ग्रामीण हद्दीतील पोलीस कर्मचारी त्यांना मिळालेल्या भत्त्यातून कापड घेऊन खाकी वर्दी शिवत होते.
अमरावती : पोलिसांची खाकी आतापर्यंत थोड्याभार फरकाने वेगवेगळी दिसत होती. मात्र, आता शिपाई ते पोलीस अधीक्षक यांच्या गणवेशाचा कापड एकसमान राहणार आहे. पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी पुढाकार घेत पोलिसांच्या खाकीचा कापड मुंबईतील एका कंपनीकडून खरेदी करून वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्हा ग्रामीण हद्दीतील पोलीस कर्मचारी त्यांना मिळालेल्या भत्त्यातून कापड घेऊन खाकी वर्दी शिवत होते. त्यामुळे काहींची खाकी गडद, काहींची फिकट असा फरक दिसून येत होता. मात्र, आता पोलीस शिपाई ते अधीक्षकांपर्यंत अशा सर्वांच्या अंगावर दिसणाºया गणवेशाच्या कापडाचा रंग व दर्जा एकसारखा राहणार आहे. पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी स्वत: पुढाकार घेत पोलिसांच्या कापडाची निवड केली तसेच मुंबईच्या ठाणे येथील एका कंपनीसोबत कापड खरेदीविषयी करार केला आहे. त्यानुसार त्या कंपनीतून सुमारे १५ हजार ५०० मीटरचा कापड बोलाविण्यात आला आहे.
पोलिसांना दर दोन वर्षांनी गणवेशासाठी ५ हजार १३७ रुपये मिळतात. यंदा या कापडासाठी पोलिासांच्या वेतनातून १ हजार ७३४ रुपयांची कपात केली जाणार आहे. ग्रामीण हद्दीतील सुमारे २ हजार ५०० पोलीस कर्मचाºयांना या कापडाचे वाटप करण्यात येणार असून, पोलीस वस्त्र भंडारातून कापड वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या गणवेशाचा कापड वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनीशी करार करून कापड खरेदी करण्यात आला आहे. पोलीस शिपाई ते अधिकारी अशा सर्वांच्या गणवेशाचे कापड एकसारखे राहणार आहे. - हरिबालाजी एन., पोलीस अधीक्षक, अमरावती