अवकाळी पाऊस, सहा हजार क्विंटल तूर ओली

By admin | Published: May 31, 2017 12:27 AM2017-05-31T00:27:27+5:302017-05-31T00:27:27+5:30

मंगळवारी दुपारी १.३० वाजता अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने परतवाडा-अचलपूर शहरासह ग्रामीण भागाला जवळपास एक तास झोडपून काढले.

The uninterrupted rainfall, 6 thousand quintals of tore ore | अवकाळी पाऊस, सहा हजार क्विंटल तूर ओली

अवकाळी पाऊस, सहा हजार क्विंटल तूर ओली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मंगळवारी दुपारी १.३० वाजता अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने परतवाडा-अचलपूर शहरासह ग्रामीण भागाला जवळपास एक तास झोडपून काढले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रावर जवळपास सहा हजार क्विंटल तूर ओली झाली असून जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सदर प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांसह बाजार समितीच्या संचालकांनी केला.
मंगळवारी दुपारी १.३० वाजता अचानक मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात सर्वत्र पावसामुळे आश्रय घेण्यासाठी दुचाकी व पादचाऱ्यांची एकच धावपळ दिसून आली. सलग तासभर पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने उन्हाच्या उकाड्यापासून शहरवासियांना गारव्याचा सुखद आनंद घेता आला. शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा पावसामुळे नाल्यांमधून वाहून जात असल्याचे चित्र होत तर प्लास्टीक ताडपत्री लादून व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने हवेमुळे जमीनदोस्त झालीत.
आणली तूर झाल्या घुगऱ्या
नाफेड खरेदी केंद्रावर शासनाची मोजणी झालेल्या तुरीचे जवळपास चार हजार क्विंटल पोते पाण्यात भिजले तर शेतकऱ्यांचे जवळपास दोन हजार क्विंटल तूर चाळणी करताना ओली झाली. पावसामुळे तूर ओली झाल्याने पोते फुटून तूर जमिनीवर पडली होती.

Web Title: The uninterrupted rainfall, 6 thousand quintals of tore ore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.