महासमाधी परिसरात ज्येष्ठ नागरिकांची अनोखी अध्यात्मिक सांज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:16+5:302021-08-01T04:12:16+5:30

फोटो - कांडलकर ३१ ओ परिसरातील वटवृक्षाची लाभते सोबत, राष्ट्रसंतांपुढे होतात नतमस्तक अमित कांडलकर - गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंतांची ...

Unique spiritual evening meeting of senior citizens in Mahasamadhi area | महासमाधी परिसरात ज्येष्ठ नागरिकांची अनोखी अध्यात्मिक सांज बैठक

महासमाधी परिसरात ज्येष्ठ नागरिकांची अनोखी अध्यात्मिक सांज बैठक

googlenewsNext

फोटो - कांडलकर ३१ ओ

परिसरातील वटवृक्षाची लाभते सोबत, राष्ट्रसंतांपुढे होतात नतमस्तक

अमित कांडलकर - गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंतांची महासमाधी प्रत्येक भक्तांसाठी ऊर्जाकेंद्र आहे. या परिसरात दररोज नित्यनियमाने संघटित होऊन जीवन रहस्याचा सार संत-महात्म्याच्या अध्यात्मिक लिखाणात शोधून कथनाच्या माध्यमातून आत्मबोध निर्माण करण्याचा अनोखा पायंडा येथील जेष्ठ नागरिकांनी आपल्या सांज बैठकीत पाडला आहे. त्यांचा हा दैनंदिन नित्यक्रम झाल्याचे गुरुकुंजात पाहायला मिळते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी परिसरात रोजच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा गोतावळा पाहायला मिळतो. पहाटेच्या वेळी महिला मोठ्या संख्येने दर्शन घेत असल्याचे निदर्शनास येते, तर सायंकाळी ज्येष्ठ समवयस्क एकाच ठिकाणी विशेषतः शारीरिक अंतर राखून बैठक घेऊन बसलेले आवर्जून दिसून येतात. परिसरात येणाऱ्या भाविकांना या दृश्याचे नेहमीच कौतुक असते. कारण आजच्या धकाधकीच्या आधुनिक युगात अशी सांज मैफल आणि तेही घरातील वयोवृद्ध व्यक्तींची खूप कमी पाहायला मिळते. येथील अनेक ज्येष्ठ नागरिक शासकीय, प्रशासकीय सेवा करून निवृत्तीनंतर आध्यत्मिक सांगड घालून आनंदी, निरोगी जीवन व्यतीत करतात. त्यांचा नियमाचा शिरस्ता ठरलेला आहे. रोज महासमाधी स्थळावर नतमस्तक होणे हा त्यातील एक भाग आहे. सहभागी सदस्यांनी ठरवून ठेवलेल्या रोजच्या वेळी हजर व्हायचे. आधी परिसरातील, देश-विदेशातील चालू घडामोडींचा आढावा घ्यायचा, मग कौटुंबिक सुख दुःख जाणून घ्यायचे.

आपल्या आयुष्यात रक्ताचे नातलग दूर असले तरी एकटेपणा अजिबात जाणू न देता नियमित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथातील अध्याय वाचन करून त्याचा अर्थ सांगितला जातो. त्याचबरोबर इतर संताच्या ग्रंथ, ओवीचे वाचन व त्याच्या अर्थ मांडण्याचा प्रयत्न या सांज बैठकीत उपस्थित प्रत्येक जण करतो. यातून अनोखी ऊर्जा प्राप्त होते. अधिक सक्षमपणे जगण्याची ऊर्मी या आध्यत्मिक साहित्यामधून प्राप्त होते, असे उपस्थित ज्येष्ठ नागरिक आवर्जून सांगतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीत अशाप्रकारची आध्यात्मिक सांज बैठक खरेच अनोखी अन् लक्षवेधी आहे.

--------------------------------------------

महासमाधी परिसर ऊर्जा स्थान असून या ठिकाणी मुबलक वृक्षसंपदा आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ बसलो तरी मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो. सोबतच अध्यात्मिक शांती लाभते.

- ................. हांडे गुरुजी, गुरुकुंज

Web Title: Unique spiritual evening meeting of senior citizens in Mahasamadhi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.