विद्यापीठाच्या अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षा ८ जुलैपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:41+5:302021-07-04T04:09:41+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न अभियांत्रिकीच्या उन्हाळी २०२१ परीक्षा ८ जुलैपासून सुरू होणार आहे. वेळापत्रक निश्चित करण्यात ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न अभियांत्रिकीच्या उन्हाळी २०२१ परीक्षा ८ जुलैपासून सुरू होणार आहे. वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, १५० पेपरसाठी २० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
कोरोना संसर्गामुळे महाविद्यालये बंद आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने परीक्षादेखील ऑनलाईन होणार आहे. ८ ते २० जुलै यादरम्यान परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यात २२ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन परीक्षा सकाळी १० ते ११ आणि १२ ते १ वाजतादरम्यान होणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नियोजन चालविले आहे. महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पेपर पाठविले जातील. प्रत्येक महाविद्यालयांना लॉगीन आयडी देण्यात आला आहे.
---------------------
इतर विषयांच्या परीक्षा ९ ऑगस्टपासून
अभियांत्रिकी वगळता अन्य विषयांच्या परीक्षा ९ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. उन्हाळी २०२१ परीक्षादेखील ऑनलाईन होतील. फार्मसी, विधी, कला, वाणिज्य व विज्ञान व अन्य शाखांच्या परीक्षा ९ ऑगस्ट घेण्यात येतील. या परीक्षासुद्धा महाविद्यालयातच ऑनलाईन होणार आहेत.
----------
कोट
उन्हाळी २०२१ परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. कोविड-१९ च्या नियमांचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येतील. प्राचार्यांनासुद्धा परीक्षांचे नियोजनादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ