विद्यापीठाची उन्हाळी-२०२१ अभियांत्रिकीच्या निकालाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:40+5:302021-08-17T04:18:40+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१ अभियांत्रिकी परीक्षांचा निकाल २० अथवा २१ ऑगस्ट रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१ अभियांत्रिकी परीक्षांचा निकाल २० अथवा २१ ऑगस्ट रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने तयारी चालविली असून, १४ शाखांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला व बुलडाणा या पाचही जिल्ह्यात २६ अभियांत्रिकी महाविद्यालयात या ऑनलाईन परीक्षा नुकत्याच पार पडल्या. महाविद्यालयाने मू्ल्यांकन करून विद्यापीठात गुण पाठविले आहे. आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागात ऑनलाईन निकाल तयार करण्यात येत आहे. २०,४८७ नियमित आणि ६३९ बॅकलॉगचे असे एकूण २१,१२६ विद्यार्थ्याचा निकाल लावण्यात येणार आहे. सेमिस्टर पॅटर्ननुसार अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा घेण्यात आल्या. ऑनलाईन परीक्षा आणि ऑनलाईन निकाल या दोन्ही बाबी परीक्षा विभागाच्या नियंत्रणात सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
-------------------
सेमिस्टर पॅटर्ननुसार अभियांत्रिकीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. २० किंवा २१ ऑगस्ट रोजी ऑनलाईन निकाल जाहीर होतील, या दिशेने तयारी चालविली आहे. १४ शाखांचे २१,१२६ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा निकाल लावण्यात येणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ