विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार कुलगुंरुच्या हस्ते प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:35+5:302021-05-04T04:06:35+5:30
संस्था व व्यक्तिगत अशा दोन गटांमध्ये हा पुरस्कार पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणारी संस्था व व्यक्तीला विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या ...
संस्था व व्यक्तिगत अशा दोन गटांमध्ये हा पुरस्कार पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणारी संस्था व व्यक्तीला विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जातो. विद्यापीठाच्यावतीने संस्था गटात सहकार महर्षि स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव, जि. बुलडाणा यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार १५ हजार, तर व्यक्तिगत गटात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला येथील प्राणीशास्त्र विभागात कार्यरत सहायक प्राध्यापक मिलिंद विष्णुपंत शिरभाते यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख पुरस्कार १० हजार देऊन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते आभासी पद्धतीने ससन्मान प्रदान करण्यात आला.
विद्यापीठ पर्यावरण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अरुणा पाटील, प्राचार्य नीलेश गावंडे, प्राचार्य गजानन जाधव व उद्यान अधीक्षक अनिल घोम या सदस्यांच्या तज्ज्ञ समितीने पुरस्कारकर्त्याची निवड केली होती. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी, तर आभार उद्यान अधीक्षक अनिल घोम यांनी मानले.