‘नॅक’ खर्चाविषयी विद्यापीठाची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:14 AM2018-04-03T00:14:19+5:302018-04-03T00:14:19+5:30

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात गत दोन वर्षांपूर्वी दौऱ्यावर आलेल्या ‘नॅक’ समितीसाठी तब्बल साडेआठ कोटींचा खर्च झाल्याने याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली. मात्र, पावणेदोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही ना चौकशी समिती, ना अहवाल यावरून सिनेट सदस्यांनी गदारोळ केला.

The University's mischief about the 'nac' expenditure | ‘नॅक’ खर्चाविषयी विद्यापीठाची नामुष्की

‘नॅक’ खर्चाविषयी विद्यापीठाची नामुष्की

Next
ठळक मुद्देपावणेदोन वर्षांनंतरही चौकशी अहवाल नाहीदीड कोटी नव्हे, साडेआठ कोटी झाला खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात गत दोन वर्षांपूर्वी दौऱ्यावर आलेल्या ‘नॅक’ समितीसाठी तब्बल साडेआठ कोटींचा खर्च झाल्याने याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली. मात्र, पावणेदोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही ना चौकशी समिती, ना अहवाल यावरून सिनेट सदस्यांनी गदारोळ केला. त्यामुळे याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना तीन महिन्यांत यातील वास्तव सिनेटसमोर सादर केले जाईल, असे जाहीर करावे लागले, हे विशेष.
गत आठवड्यात सिनेट सदस्यांची सभा पार पडली. अर्थसंकल्पीय विषय असले तरी सिनेट सदस्यांनी सादर केलेल्या प्रश्नोत्तराच्या तासात प्रवीण रघुवंशी यांनी ‘नॅक’ खर्च आणि चौकशी समितीच्या रेंगाळलेल्या अहवालावरून प्रश्नांचा भडिमार केला. विद्यापीठात नॅक समिती येणार असल्याने सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात ३० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाने मान्यता नसताना अंदाजे ५ कोटी रूपयांचे साहित्य खरेदी केले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. संतोष ठाकरे यांनी ३१ मार्च २०१६ च्या सिनेट सभेत नॅक समिती दौºयाबाबत खरेदी करण्यात आलेल्या प्रकरणातील ‘नस्त्या’ सीलबंद करण्याची मागणी केली होती. नस्त्या बंद केल्या असल्या तरी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एफ.सी. रघुवंशी, मनोज तायडे, बमनोटे अशा चार सदस्यांची समिती गठित होती. या समितीच्या १७ मे २०१७ पर्यंत सात बैठकी झाल्यात. मात्र, अद्यापही समितीकडून चौकशी अहवाल मिळाला नाही. त्यामुळे सिनेट सदस्यांनी नॅक समिती दौºयात दीड कोटी खर्च झाल्याचे अधिकृत सांगत असल्याचा मुद्दा संतोष ठाकरे, प्रवीण रघुवंशी यांनी उपस्थित केला.

कुलगुरुंना करावा लागला सामना
२८ मार्च २०१८ रोजी झालेल्या सिनेट सभेत ‘नॅक’ समितीच्या दौºयात साडेआठ कोटी रूपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. ‘नॅक’ दौºयात साहित्य खरेदीचे प्रकरण विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळातील नसले तरी याप्रकरणी असलेल्या उणिवा, अपहार आदींबाबत त्यांनाच सामना करावा लागत आहे.सिनेट सभेत कुलगुरुंनी चौकशी अहवाल तीन महिन्यांनंतर होणाºया अधिसभेत ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे 'नॅक' दौरा साहित्य खरेदीत चौकशी अहवालात काय दडले आहे, हे स्पष्ट होईल.

Web Title: The University's mischief about the 'nac' expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.