विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:14 PM2018-03-06T23:14:03+5:302018-03-06T23:14:03+5:30
संत गाडगे बाबा विद्यापीठाची उन्हाळी- २०१८ ही परीक्षा १५ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा घेण्यासंदर्भात २१ ङिसेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : संत गाडगे बाबा विद्यापीठाची उन्हाळी- २०१८ ही परीक्षा १५ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा घेण्यासंदर्भात २१ ङिसेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या मार्गदर्शनात उन्हाळी परीक्षेचा डोलारा पार पाडण्यासाठी परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालक जयंत वडते यांनी सूक्ष्म तयारी चालविली आहे. परीक्षा आटोपताच ४५ दिवसांच्या आत सदर पेपरचा निकाल लावण्यासाठी स्वतंत्र चमू गठित केली आहे. विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट, नामांकन क्रमांकापासून तर परीक्षेस उशिरा अर्ज सादर करणाºया विद्यार्थ्यांचा डेटा तयार केलेला आहे. परीक्षा काळात अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्यांसोबत संवाद बैठक घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. अभियांत्रिकी, विधी आणि फार्मसीची आॅनलाईन परीक्षा, मूल्यांकन व निकाल या सर्व बाबी विद्यापीठ प्रशासनाने एजन्सीकडे सोपविल्या आहेत. १५ मार्चपासून आणि पुढे सुरू होणाºया परीक्षांमध्ये बीए. भाग १, ३, बीए. अॅडिशनल, बीए. समाजशास्त्र आणि बीएसडब्ल्यू भाग १, ३ तर बी.लिब., बीपीए, बीएफए व बीजेएमसी भाग १, ३ चा समावेश असणार आहे. बी.कॉम, बी.बी.ए, एम.कॉम, एमसीएम, एम.एच.आर.डी, पी.जी. डिप्लोमा इन कॉम्प्यूटर मॅनेजमेंट, पीजीडीसीसीए डिप्लोमा इन अॅक्चुरिअल सायन्स, पीजी डिप्लोमा इन साऊन्ड रेकॉर्डिंग भाग १, ३ या पेपरचा समावेश आहे. बीएसस्सी सेमीस्टर ३, ५ व बी.सी.ए. सेमिस्टर १, ३, ५ तसेच बी. टेक कॉसमॅटिक सेमिस्टर ३,५,७, बीएफडी सेमिस्टर ३,५, एम.टेक कॉसमॅटिक सेमिस्टर भाग १ या पेपरचा समावेश आहे. बी.एड सेमिस्टर भाग १, ३, बी.एड. (हिंदी) सेमिस्टर भाग १, २, ३, एम.एड भाग १, ३, सेमिस्टर १, ३, बी.पी.एड भाग १,३ आदी पेपरचा समावेश आहे.
उन्हाळी परीक्षांमध्ये कोणत्याही उणिवा राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे. परीक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याअनषंगाने कार्यरत असून, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांच्या मार्गदर्शनात परीक्षा पार पाडल्या जातील.
- जयंत वडते,
संचालक, परीक्षा नियंत्रक