अप्पर वर्धा जलाशयात विनापरवाना मासेमारी, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:10 AM2021-01-09T04:10:57+5:302021-01-09T04:10:57+5:30
फोटो पी वरूड ०८ वरूड : अप्पर वर्धा जलाशयतून विनापरवाना मासेमारी करताना एका मासोळी चोराला रंगेहाथ अटक करण्यात आली. ...
फोटो पी वरूड ०८
वरूड : अप्पर वर्धा जलाशयतून विनापरवाना मासेमारी करताना एका मासोळी चोराला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याचेकडून दुचाकीसह एक क्विंटल मासोळी जप्त करून बेनोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर शालिकराम मेश्राम (३०, रा. वर्धापूर वडाळा, ता. आष्टी, जि. वर्धा) असे मृताचे नाव आहे. ७ जानेवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली.
मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा जलाशयामधील मासेमारीचे कंत्राट हातुर्णा येथील दत्तात्रेय मच्छी व्यावसायिक सहकारी संस्था या संस्थेला देण्यात आले. परंतु, अनेक मासेमार त्यांच्याकडून परवाना न घेता तलावात उतरतात. त्यापार्श्वभूमिवर किशोर मेश्राम याच्याकडून एमएच ३२ एएन २७०६ क्रमांकाच्या दुचाकीसह राहू, कतला, तल्पी, मिरगल असे एक क्विंटल मासे, मोबाईल, ३० हजार रुपये किमतीचे दोन जाळे व ६ हजार ६५० रुपये रोख असा एकूण १ लाख ६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम साबळे, मुरलीधर वानखडे, दिनेश राऊत, दिवाकर वाघमारे हे तपास करीत आहेत.
---------------