खासगी प्रवासी बसेसच्या टपावर नियमबाह्य मालवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:54+5:302021-06-04T04:10:54+5:30

अमरावती : पीडीएमसी रुग्णालयाजवळ खासगी बसेसचे टिकीट बुकींग कार्यालय आहेत. येथूनच, पुणे- औरंगाबाद, मुंबई, मध्यप्रदेशच्या काही बसेस सुटतात. खासगी ...

Unlicensed freight on private passenger buses | खासगी प्रवासी बसेसच्या टपावर नियमबाह्य मालवाहतूक

खासगी प्रवासी बसेसच्या टपावर नियमबाह्य मालवाहतूक

Next

अमरावती : पीडीएमसी रुग्णालयाजवळ खासगी बसेसचे टिकीट बुकींग कार्यालय आहेत. येथूनच, पुणे- औरंगाबाद, मुंबई, मध्यप्रदेशच्या काही बसेस सुटतात. खासगी बसेसला वेलकम पॉईंटजवळ पार्किंगकरिता अधिकृत जागा दिल्यानंतरही बसेसचा शहरात लॉकडाऊनमध्ये शिरकाव होत असून, बसच्या टपावर नियमबाह्य मालवाहतूक केली जात असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पाहता कारवाईची मागणी होत आहे.

पीडीएमसीजवळील सरोज ट्रव्हल क्रमांक एमएच २७-बीएफ ०३११ मध्ये बसच्या टपावर माल चढविण्यात येत असल्याचा फोटो गुरुवारी साडेपाच वाजताच्या सुमारास कैद झाला आहे. त्यानंतर रात्री या बसमध्ये प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. मात्र, हा प्रकार नियमबाह्य असून आरटीओच्या नियमानुसार याला परवानगी नाही. त्यामुळे अशा बसेसवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे. बसेस उंच असल्याने व त्यावर विविध प्रकारचे लगेच नेले जात असल्याने विद्युत ताराला स्पर्श होऊन अपघाताचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

कोट

खासगी वाहनाच्या टपावर मालवाहतूक करणे नियमबाह्य आहे. अशाप्रकारे वाहतूक केली जात असेल तर स्कॉडला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

- रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती

Web Title: Unlicensed freight on private passenger buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.