‘मॉडेल’मध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:33 PM2018-05-09T22:33:00+5:302018-05-09T22:33:59+5:30

येथील ‘मॉडेल’ रेल्वे स्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री कुणाच्या मेहरबानीने सुरू आहे, असा सवाल सामान्य प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

Unloading of unauthorized food items in 'Model' | ‘मॉडेल’मध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीला उधाण

‘मॉडेल’मध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीला उधाण

Next
ठळक मुद्देराजरोसपणे व्यवसाय : रेल्वे पोलीस, सुरक्षा दलाची मूकसंमती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील ‘मॉडेल’ रेल्वे स्थानकावर अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री कुणाच्या मेहरबानीने सुरू आहे, असा सवाल सामान्य प्रवाशांनी उपस्थित केला आहे. रेल्वेचे परवाना नाही; तरीही प्लॅटफार्म, गाड्यांमध्ये राजरोसपणे खाद्यपदार्थ विक्री होत असून, याला रेल्वे पोलीस, सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांची मूकसंमती असल्याचे चित्र आहे.
अमरावती रेल्वे स्थानकावर परवानाधारक खाद्यपदार्थ विक्रेते नेमले नाहीत. मात्र, चार ते पाच वर्षांपासून एक व्यक्ती बिनधास्त रेल्वे स्थानकावर येऊन खाद्यपदार्थ, शीतपेय, पाणी बॉटलची विक्री करतो. त्याने पाच-सहा माणसे खाद्यपदार्थ विक्रीसाठी नेमले आहेत.
वरिष्ठांंचे दुर्लक्ष
रेल्वे नियमानुसार प्लॅटफार्मवर तिकीट घेऊन जावे लागते. एरवी सामान्य प्रवाशांविरुद्ध प्लॅटफार्म तिकीट नसल्यास कारवाई होेते. तथापि, अनधिकृत खाद्यपदार्थ विकण्याचे धाडस करणाºया व्यक्तीला अभय का दिले जाते, याच्या उत्तरातच गुपित दडले आहे. ‘मॉडेल’वर रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांची स्वतंत्र चौकी असताना, या अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्याविरुद्ध कारवाई झाली नाही. प्लॅटफार्मवर चक्क खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान थाटण्यापर्यत त्याने मजल गाठली आहे. सकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत सर्वांदेखत मॉडेल रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांची दुकानदारी कुणाच्या ‘आशीर्वादा’ने सुरू आहे.
नागरिकांचा मुक्त संचार
मॉडेल रेल्वे स्थानकावरून दरदिवशी सहा ते सात प्रवासी गाड्या धावतात. हजारो प्रवाशांची येथे ये-जा असताना, तीनही प्लॅटफार्मवर इतरांचा मुक्त संचार असतो. काहींनी तर रेल्वे स्थानकाला शतपावलीचे ठिकाण बनविले आहे. रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे हे द्योतक आहे. कोणी, कोठेही मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येते.
मद्यपींचा अड्डा!
रेल्वे स्थानकावर रात्री ९ वाजेनंतर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या नसल्याने परिसर निमर्नुष्य होतो. बोटावर मोजण्याइतके रेल्वे कर्मचारी प्लॅटफार्मवर कर्तव्यावर असतात. गाड्यांची वेळ संपली की, रेल्वे पोलीस चौकीत ठिय्या मांडून असतात. त्यामुळे उशिरा रात्री प्लॅटफार्म तसेच स्टेशन परिसरात मद्यपी, गर्दुल्यांचा खुला वावर ही नित्याचीच बाब झाली आहे.

Web Title: Unloading of unauthorized food items in 'Model'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.