जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:44+5:302021-06-06T04:09:44+5:30

अमरावती : जिल्ह्यात शनिवारची पॉझिटिव्हिटी ४.६० टक्के आहे व एकूण उपलब्धतेच्या ७६ टक्के प्रमाणात ऑक्सिजन बेड रिक्त असल्याने ...

Unlocked in the district from Monday? | जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक?

जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक?

Next

अमरावती : जिल्ह्यात शनिवारची पॉझिटिव्हिटी ४.६० टक्के आहे व एकूण उपलब्धतेच्या ७६ टक्के प्रमाणात ऑक्सिजन बेड रिक्त असल्याने शासनादेशानुसार जिल्हा निर्बंध उठविण्याच्या प्रक्रियेत तिसऱ्या स्तरात आहे. त्यामुळे अटी व शर्तींच्या अधीन राहून सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया राबविली जाईल. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील, तर बिगर जीवनावश्यक दुकाने याच कालावधीत सुरू राहत असली तरी शनिवार व रविवारी बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी तसे आदेश जारी केले.

या आदेसानुसार किराणा दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे, फळविक्रेते, दूध विक्रेते, बेकरी मिठाई, सर्व प्रकारची शीतगृहे, वखार केंद्र, सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक सेवा, स्थानिक प्रशासनाद्वारा मान्सूनपूर्व कामे व देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा, दूरसंचार सेवेअंतर्गत दुरुस्ती, सर्व प्रकारची मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, कृषी संबंधित सेवा, ई-कामर्स सेवा, पेट्रोल व पेट्रोलियम पदार्थांची उत्पादने व सर्व प्रकारची मालवाहतूक सेवा, एटीएम, पोस्ट व कुरिअर सेवा आदींचा अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

याशिवाय सायंकाळी ५ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाणार आहे.

बॉक्स

१) सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवांतर्गत दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवारी बंद.सर्व प्रकारची मद्यालये व बार याच वेळेत सुरू राहतील. मात्र, शनिवारी व रविवारी याच वेळेत घरपोच सेवा राहील.

२) हॉटेल, रेस्टारंट, खानावळ, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत ५० टक्के आसन क्षमतेसह व रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा याशिवाय शनिवार ते रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घरपोच सेवा द्यावी लागणार आहे.

३)सावर्जनिक ठिकाणी, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे मॉर्निंग वॉक, सायकलिंग रोज रात्री ५ ते ९ पर्यंत मुभा आहे. क्रीडा व मनोरंजन (आंतर मैदानी खेळ बंद राहतील. बाह्य मैदानी खेळास परवानगी) बाहेर मोकळ्या जागी सकाळी ५ ते दुपारी १ मुभा

४) लग्न समारंभ (कॅटरिंग, बँडपथक, वधु-वरासह)५० लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालये, सभागृह, विवाहस्थळी, कोरोना नियमांचे पालन अनिवार्य, स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.

५) शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने ही ५० लोकांच्या उपस्थितीत करता येईल. मात्र, स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक.

६) अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीसह परवानगी आहे. सभा, बैठका, स्थानिक प्राधिकरण निवडणूक, सहकारी संस्थांची आमसभा एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्केच्या मर्यादेत परवानगी राहणार आहे.

७) कृषी संबंधी सर्व कामे दुपारी ४ पर्यंत, बांधकाम फक्त साईटवर असणारे मजूर अथवा बाहेरून आणण्याच्या बाबतीत दुपारी ४ पर्यंत, शासकीय रेशन दुकान व चष्म्याची दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत मुभा असेल.

८) जीम , व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर,एकूण क्षमतेच्या ५० टक्के मात्र, पूर्व परवानगी आवश्यक, वातानुकूलीत सेवेस मनाई, सार्वजनिक वाहतुक सेवेला पूर्ण क्षमतेसह परवानगी, प्रवाश्यांना उभे राहून प्रवासास मनाई

९)आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक नियमितपणे पूर्णवेळ, मात्र, २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी असणाऱ्या जिल्ह्यातून येत असल्यास ई-पास आवश्यक, जमावबंदी सायंकाळी ५ पर्यंत व संचारबंदी सायंकाळी ५ नंतर राहील.

१०) सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, मेडिकल स्टोअर्स, औषधालय, दवाखाने व ऑनलाईन औषध सेवा या कालावधीत २४ तास सुरू राहतील.

पाईंटर

कोरोनाचे एकूण रुग्ण : ९३,७८२

बरे झालेले रुग्ण : ८८,७०१

एकूण मृत : १,४९५

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : ३,५८६

सध्या ऑक्सिजन बेडवरील रुग्ण : २५१

जिल्ह्याचा शनिवारचा पाॅझिटिव्हचा रेट : ४.६०टक्के

Web Title: Unlocked in the district from Monday?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.