अंबानगरीत उद्योगांना चालना
By admin | Published: May 9, 2017 12:13 AM2017-05-09T00:13:55+5:302017-05-09T00:13:55+5:30
अंबानगरीच्या मातीत दिवसांदिवस उद्योग वाढतच आहेत. यातून रोजगार निर्मिती होत आहे.
पालकमंत्री : छोट्यातून मोठ्या उद्योगाची निर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरीच्या मातीत दिवसांदिवस उद्योग वाढतच आहेत. यातून रोजगार निर्मिती होत आहे. हीसकारात्मक बाब आहे. राज्यात ५० लाख युवकांना रोजगाराच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे आपले ध्यये असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले आहे. येथील जिल्हा उद्योग केंद्र अमरावतीच्यावतीने आयोजित जिल्हा उद्योजक केंद्रांना जिल्हा पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. छोट्या-छोट्या उद्योगातून मोठे उद्योग निर्माण करणे सोयीचे नाही. पण अमरावतीच्या उद्योजकांनी चांगले उद्योग निर्माण करून यशोशिखर गाठल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग संचालनालय जिल्हा उद्योग केंद्र अमरावतीतर्फ आयोजित सन २०१५ व २०१६ करिता उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल उद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला. यामध्ये कृषी उद्योगात आघाडीवर असलेल्या अंजनगाव बारी येथील स्पेशल बॅयोकेम प्रा.लि.चे संचालिका निशा सोनारे यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांनी महिलांना मोठा रोजगार उपलब्ध केला असून महिला सक्षमीकरणसाठी निशा सोनारे यांनी पुढाकार घेतला. ही कंपनी बायो फर्टिलायइजर माइक्रो न्यूट्रियन सारखे प्रोडक्टची निर्मिती करून देशभरात शेतकऱ्यांना स्वस्त दरात प्रोडक्ट उपलब्ध करून देते. तसेच याच कंपनीने प्लॅस्टिक युनिट मधेही झेप घेतली आहे. व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार लक्ष्मी रिफायनरी नांदगावपेठ,
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, महाव्यस्थापक उदय पुरी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते.