अनैसर्गिक कृत्य, तीन वर्षांचा कारावास
By Admin | Published: December 6, 2015 12:06 AM2015-12-06T00:06:36+5:302015-12-06T00:06:36+5:30
एका १० वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ...
न्यायालयाचा निर्णय : आनंदनगरात २०१० मध्ये घडली घटना
अमरावती : एका १० वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. गजानन दौलत सावरकर (२६, रा. आनंदनगर, महाजनपुरा मार्ग) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित १० वर्षीय बालिका आई व तीन मावशींसोबत आजीच्या घरी राहत होती. ७ जुलै २०१० रोजी पीडित बालिकेची आजी कामावर गेली होती. रात्री ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास तिची आजी घरी परतली असता पीडित, तिची आई व तीन मावशी घरी झोपल्या होत्या.
दरम्यान आजी बाथरुमला गेली असता आरोपी गजाननने पीडित बालिकेच्या घरात शिरला. आरोपीने तिला खाद्यांवर उचलून दत्तुवाडीजवळील नागोबा मंदिर परिसरातील एका मोकळ्या जागेवर नेले. तेथे तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर आरोपीने पीडित बालिकेला पुन्हा घराजवळ नेऊन सोडले व तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती पीडिताच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी तत्काळ खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करून शोधकार्य सुरू केले.
काही दिवसांत पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशीअंती २१ आॅगस्ट २०१० रोजी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (४) एम.ए. शिलार यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता आशा ठाकरे यांनी १५ साक्षीदार तपासले.