पळसखेड मार्गावरील कठडे नसलेला पूल देतो अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:28+5:302021-06-16T04:17:28+5:30

पुलाची उंची सुध्दा वाढविण्याची गरज जास्त प्रमाणात पाऊस आल्यास नाला व रस्त्यावरील पाणी होते एकसमान फोटो पी १४ पळसखेड ...

An unpaved bridge on the Palaskhed route invites accidents | पळसखेड मार्गावरील कठडे नसलेला पूल देतो अपघाताला निमंत्रण

पळसखेड मार्गावरील कठडे नसलेला पूल देतो अपघाताला निमंत्रण

googlenewsNext

पुलाची उंची सुध्दा वाढविण्याची गरज

जास्त प्रमाणात पाऊस आल्यास नाला व रस्त्यावरील पाणी होते एकसमान

फोटो पी १४ पळसखेड

पुलाची उंची वाढविण्याची गरज : अधिक पाऊस आल्यास नाला, रस्त्यावरील पाणी होते एकसमान

चांदूर रेल्वे : शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावरील नाल्याच्या पुलाला कठडे नसल्याने ‘कठड्याविना पूल अपघातास निमंत्रण’ अशी स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे, कठडे नसलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून, सदर पुल पावसाळ्यात जीवघेणा ठरू शकतो. जास्त प्रमाणात पाऊस आल्यास नाला व रस्त्यावरील पाणी एकसमान होत असल्याने पुलाची उंचीसुद्धा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाहतुकीच्या सोयीसाठी नदी-नाल्यांवर पूल बांधण्यात येतात. सुरक्षेसाठी कठडेही लावले जातात. मात्र, चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील पाईप कंपनीजवळील पूल कठड्यांविना आहे. पावसाळ्यात नागरिकांचा या पुलावरून प्रवास जीवघेणा ठरू शकतो. विशेष म्हणजे हा पूल वळण रस्त्यावर असून या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नसल्याने अनेक वाहने भरधाव जातात व अपघाताची शक्यता वाढते. पावसाळ्यात नाल्याचे पाणी वाढल्यास पाणी रस्त्यावर येते व ते आणखी वाढत राहिल्यास रस्ता कोणता आणि नाला कोणता, हेसुद्धा चालकांना ओळखायला येत नाही. अशा स्थितीत गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना १० जून रोजी घडली. यात सुदैवाने एका कुटुंतील सहा जणांचे प्राण वाचले. अनेक दुचाकीचालक गाडी घसरून या पुलावर पडले आहेत. त्यामुळे आता तरी प्रशासन यावर उपाययोजना करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(बॉक्समध्ये घेणे)

१)

रेल्वे अंडपासमध्ये साचते पाणी

पळसखेड मार्गावर याच पुलाजवळ रेल्वे अंडरपास आहे. तेथेसुद्धा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने एक कार ११ जून रोजी रात्री पाण्यात फसली होती. रेल्वे अंडरपासमध्ये जमा होणाऱ्या पाण्यासाठी प्रशासनाकडून काही उपाययोजना करणे महत्त्वाचे असून, अन्यथा येथेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२)

पुलाचे रुंदीकरण होऊन कठडे लावणे गरजेचे आहे. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक गाड्या या नाल्यामध्ये पडत आहे. साईडने प्रशासनाने काही बांधल्यास वाहनचालकांची गैरसोय टळेल. त्यामुळे तातडीने प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्या.

- दीपक चौधरी, नागरिक

२)

रस्त्यावर पुलाजवळ तातडीने स्पीडब्रेकर लावून इतरसुद्धा उपाययोजना करण्यात येतील.

.................... कोवळे, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग

(फोटोओळ - चांदूर रेल्वे - १) चांदूर रेल्वे - पळसखेड मार्गावरील कठडे नसलेला हाच तो धोकायदायक पूल, २) पाण्यात अंदाज न आल्याने नाल्यात घसरत असलेले एक चारचाकी वाहन तसेच ३) दुचाकी घसरल्याने घडलेला एक अपघात (छाया - शहजाद खान) )

===Photopath===

140621\img-20210614-wa0009.jpg

===Caption===

photo

Web Title: An unpaved bridge on the Palaskhed route invites accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.