स्थानकांत लालपरीचालकांची बेशिस्त;प्रवाशांना मनस्ताप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:17 AM2021-08-28T04:17:24+5:302021-08-28T04:17:24+5:30
दुर्लक्ष ; फलाटावर बस न लावता इतरत करतात उभी अमरावती: अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या तशाच ...
दुर्लक्ष ; फलाटावर बस न लावता इतरत करतात उभी
अमरावती: अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या तशाच गाव खेड्यांना जाणाऱ्या बसेस नियमितपणे फलाटावर लागतात. मात्र काही बसेल फलाटावर न लावता इतरत्र उभ्या करून ठेवत असल्याने लालपरी चालकांची बेशिस्त प्रवाशांना मात्र डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने या काळात बस फेऱ्या देखील वाढल्या आहेत.त्यातच प्रवाशांची गर्दी वाढली आहे. चालक बस फलाटावर उभी न करता इतरत्र उभी करून ठेवत असल्याने बस शोधतांना प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. काही बसेस स्वच्छतागृह जवळ लागतात त्यामुळे खेड्या पाड्या वरून आलेले प्रवासी देखील बसची वाट पाहत ताटकळत उभे राहतात. विशेष म्हणजे अस्ताव्यत बसेस बसस्थानकावरील फलाटावर न लागल्यास अपघाताची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बस लावताना चालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
बॉक्स
कोट
बस स्थानकावर दिलेल्या फलाटावर बस लागत नसल्यामुळे परिणामी अनेकदा बसची वेळ चुकते. त्यामुळे दुसऱ्या बसची वाट पाहात ताटकळत थांबून राहावे लागते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सतीश ईश्वरकर प्रवासी
कोट
नागपूरला जाण्यासाठी बस फलाटावर लागते .मात्र त्याच वेळेस इतर आगाराच्या बस स्थानकात आल्यावर प्रथम कोणती बस जाणार आहे. याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण होते.
प्रमोद बावनथडे
प्रवासी
कोट
मध्यवर्ती बसस्थानकावरील फलाटावर बस गाड्या व्यवस्थित लावण्याच्या सूचना चालकांना दिल्या आहेत. फलाटावर बस न लावलेल्या चालकांना समजही दिली जाते.बसेस फलाटावर उभ्यास असल्यास याची माहिती प्रवाशांना लाऊडस्पिकरच्या माध्यमातून दिली जाते.बसेस फलाटावरच लागव्यात याकरीता सातत्याने प्रयत्न आहेत.
श्रीकांत गभने
विभाग नियंत्रक