अवकाळीचे नुकसान, २.९१ कोटींचे अनुदान सहा तालुक्यांना वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:36+5:302021-07-05T04:09:36+5:30
अमरावती : जिल्ह्यात मे महिन्यात १६ व १७ तारखेला पडलेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सहा तालुक्यातील घरांसह, फळबागांचे मोठ्या प्रमाणात ...
अमरावती : जिल्ह्यात मे महिन्यात १६ व १७ तारखेला पडलेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सहा तालुक्यातील घरांसह, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी २.९१ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आलेले असून सहा तालुक्यांना वितरित करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
यामध्ये घरांच्या नुकसानीसाठी एसडीआरनुसार १,९१,००० व वाढीव दराचे ७०,०००, नष्ट झालेल्या घरांसाठी एसडीआरएफचे ६७,१४,३०० व वाढीव दराचे ७१,७५,७००, शेती व फळपिकांच्या नुकसानीसाठी एसडीआरएफचे ३१,२३,००० व वाढीव दराने ३५,१८,०००, याशिवाय मोफत रेशन व अन्नधान्याकरिता २२,७३,००० रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.
तालुकानिहाय पाहता, अमरावती तालुक्याला २,५२,०००, चांदूर बाजार १३,०९,०००, वरुड २,५८,९४,०००, दर्यापूर तालुक्यात १,२५,०००, अंजनगाव सुर्जी ७,९३,००० व अचलपूर तालुक्यात ७,४७,००० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. हे अनुदान बाधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.