श्री जैन श्वेताम्बर बडा मंदिराच्या कव्हरचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:37 PM2018-11-24T22:37:27+5:302018-11-24T22:37:47+5:30
टपाल विभागाने मोठा काळ अविरत सेवा देऊन देशभरातील जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. ही विश्वासार्हता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग व इतर व्यवहारांची जबाबदारी टपाल खात्याकडे सोपवली. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या युगातही हा विभाग प्रभावी काम करेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.
अमरावती : टपाल विभागाने मोठा काळ अविरत सेवा देऊन देशभरातील जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. ही विश्वासार्हता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग व इतर व्यवहारांची जबाबदारी टपाल खात्याकडे सोपवली. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या युगातही हा विभाग प्रभावी काम करेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.
भारतीय टपाल विभागातर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शनिवारी जिल्हास्तरीय टपाल प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री जैन श्वेताम्बर बडा मंदिराच्या विशेष कव्हरचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष नगिनचंद्र बुच्चा, सचिव नविन चोरडिया, मुख्य पोस्टमास्टर रामचंद्र जायभाये, प्रवर डाक अधिक्षक विनोदकुमार सिंह, दामोदर सुखसोहळे, फिलाटेली संघटनेचे अहमद व जिल्ह्यातील अनेक तिकीट संग्राहक यावेळी उपस्थित होते. विविध विषयांवरील टपाल तिकिटांचे प्रदर्शन २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत सर्वंसाठी खुले राहील.