‘लोकमत रक्ताचं नातं’ लोगोचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:00 AM2021-06-19T05:00:00+5:302021-06-19T05:00:27+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. अशा समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव अवश्य वाचणार आहे. - विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा.

Unveiling of 'Lokmat Raktacha Naat' logo | ‘लोकमत रक्ताचं नातं’ लोगोचे अनावरण

‘लोकमत रक्ताचं नातं’ लोगोचे अनावरण

Next
ठळक मुद्दे२ जुलैपासून रक्तदान महायज्ञ : रक्तदान करून जीव वाचविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेला प्रारंभ होत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. चंद्रपूरात या मोहिमेच्या लोगोचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गहलोत, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. अविनाश टेकाडे यांच्या हस्ते झाले. 
याप्रसंगी जिल्हाभरातील रक्तदाते व विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. रक्ताची रुग्णांना सातत्याने गरज भासत आहे. रक्त हे कोणत्याही कंपनीत उत्पादीत होत नसल्याने रक्तदानाशिवाय रक्तसंकलन होणे शक्य नाही. 
कोरोनाकाळात रक्तदान शिबिरांवरही परिणाम झाल्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली आहे. आता ती कमतरता भरुन काढण्यासाठी अशा रक्तदान मोहिमेची गरज आहे. ‘लोकमत’च्या स्तुत्य उपक्रमात सर्वांनी ‘हेच कार्य महान’ ही भूमिका निभवण्याचे आवाहन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, आभार लोकमतचे चंद्रपूर शाखा व्यवस्थापक विनोद बुले व लोकमत सखी मंच संयोजिका सोनम मडावी यांनी केले.

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. अशा समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव अवश्य वाचणार आहे.
- विजय वडेट्टीवार, 
पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा.
 

लोकमतच्या या उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन ‘लोकमत’ने या उपक्रमात रक्ताचं नातं जोपासण्याचा ध्यास घेतला आहे. आपणही रक्तदान करून कुणाचा तरी जीव वाचवून रक्ताचं नातं तयार करू शकतो. ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अतिशय मौल्यवान उपक्रम आहे.
- संध्या गुरुनुले, 
अध्यक्ष, जि.प. चंद्रपूर.
 

सध्या महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे. यासोबतच जिल्ह्यातही दररोज सरासरी ५० बाॅटल रक्ताची गरज कुणाला तरी वाचिवण्यासाठी भासत आहे. रक्ताची मागणी वाढते आहे. मात्र रक्ताचा अपेक्षित पुरवठा होण्यास अडचण होत आहे. रक्तदानातूनच ही गरज पूर्ण करता येणे शक्य आहे. लोकमतने हाती घेतलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अमुल्य अशा उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे. ही काळाचीही गरज आहे.
- अजय गुल्हाने,
 जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
 

Web Title: Unveiling of 'Lokmat Raktacha Naat' logo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.