१३ ग्रामपंचायतचे उपसरपंच बिनविरोध तर ६ ठिकाणी निवडणूक

By जितेंद्र दखने | Published: November 23, 2023 10:16 PM2023-11-23T22:16:07+5:302023-11-23T22:16:25+5:30

नवनिर्वाचित सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडली पहिली सभा

Upasarpanch of 13 gram panchayats unopposed and election in 6 seats | १३ ग्रामपंचायतचे उपसरपंच बिनविरोध तर ६ ठिकाणी निवडणूक

१३ ग्रामपंचायतचे उपसरपंच बिनविरोध तर ६ ठिकाणी निवडणूक

अमरावती: जिल्ह्यात ८ तालुक्यामधील १९ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकी गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी नवनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांमधून उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत १३ ग्रामपंचायतींचे उपसरपंच अविरोध निवडूण आले आहेत. तर सहा ठिकाणी निवडणूक घेण्यात आली.

१९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका ५ नोव्हेबर रोजी पार पडल्यात. या ग्रामपंचायतीत सरपंच पदाकरीता थेट निवडणूक घेण्यात आली.या निवडणूकीचा निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर नव्याने गठीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठीची पहिली सभा २३ नोव्हेंबर रोजी १९ ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेत भातकुली,चांदूर रेल्वे,मोर्शी,अचलपूर,चांदूर बाजार,अंजनगाव सुजी,धारणी,चिखलदरा या तालुक्यातील १३ ग्रामपंचातींचे उपसरपंच बिनविरोध निवडूण आले आहेत.तर ६ ग्रामपंचातीमध्ये मात्र उपसरपंच पदाकरीता निवडणूक पार पडली.

बिनविरोध निवडणूक आलेले सरपंच असे
भातकुली तालुक्यातील बैलमारखेडा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदी कांताबाई राणे, चांदूर रेल्वे मधील कारला येथे शैलेद्र गिरासे,पाथरगांव रविंद्र मोखळे,मोर्शीमधील गोराळा प्रज्ञा खडसे, ब्राम्हणवाडा पंकज पांडे, अचलपूर मधील देवगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी गोविंदा पाटील,कोठारा संदेश पलघामोल,चांदूर बाजार तालुक्यातील मिर्झापूर अशोक उके,अंजनगाव सुजी मधील जवळा बु.सरला बहिरे,हयापूर- योगेश भारसाकळे,धारणी मधील जामपाणी मदत जावरकर, आणि चिखलदरा तालुक्यातील सोनापूर -शंकर बेलसरे,टेब्रुसोंडा- अनिता उमरकर आदी उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

येथे पार पडली निवडणूक
ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी पार पडलेल्या निवडणूकीत विजयी झालेल्या उपसरपंचामध्ये मोर्शी तालुक्यातील मनिमपूर येथे शिवा मेश्राम,रिध्दपूर विलास वानखडे,अचलपूर मधील पिंपळखुटा वंदना सावलकर,निमदरी रमेश बेलसरे,धारणी तालुक्यातील बोबदो उर्मिला पटेल,महरीआम राजू अखंडे आदी ठिकाणी उपसरपंच निवडून आले आहेत.

Web Title: Upasarpanch of 13 gram panchayats unopposed and election in 6 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.