अंजनगाव सुर्जी येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:07+5:302021-03-24T04:13:07+5:30

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या बांधकामासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात सुमारे ८.२५ कोटी रुपये निधी ...

Upgradation of Anjangaon Surji Hospital | अंजनगाव सुर्जी येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन

अंजनगाव सुर्जी येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन

Next

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या बांधकामासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात सुमारे ८.२५ कोटी रुपये निधी वितरण झाले आहे. यामुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी रुग्णालयांच्या बांधकामांबरोबरच इतरही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. त्यानुसार निधी प्राप्त करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सतत पाठपुरावा केला. अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी पालकमंत्र्यानी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लेखी निवेदनाद्वारे निधीची मागणी केली होती. आमदार बळवंत वानखडे यांनीही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमानुसार राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून अमरावतीतील अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील निधी उपलब्ध झाला आहे.

बॉक्स

अचलपूर रुग्णालयासाठीही निधी

अचलपूर येथील २०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी सुमारे सहा कोटी रुपये पहिल्या टप्प्यातील निधी मिळाला आहे. त्याचप्रमाणे अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यानंतर ५० खाटांच्या रुग्णालयासाठी केंद्र व राज्य हिस्स्याचे मिळून २.२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Web Title: Upgradation of Anjangaon Surji Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.