यू-डायसची ८९ टक्के माहिती अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:16+5:302021-05-26T04:13:16+5:30
अमरावती : शालेय शिक्षण विभागाने शाळांना यू-डायसमध्ये माहिती ऑनलाईन भरण्याचे आदेश दिले. दुसरीकडे अनेक शिक्षक, मुख्याध्यापकांची कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ...
अमरावती : शालेय शिक्षण विभागाने शाळांना यू-डायसमध्ये माहिती ऑनलाईन भरण्याचे आदेश दिले. दुसरीकडे अनेक शिक्षक, मुख्याध्यापकांची कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सेवा घेतली जात आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात माहिती भरण्याचे काम ८९ टक्के पूर्ण झाले आहे.
यू-डायस प्लस प्रणाली ही केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केली. समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता यू-डायस प्लस प्रणालीमार्फत माहिती मागवली जाते. यातील यू-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य, जिल्हा, महापालिका व तालुका तसेच शाळास्तरावर ऑनलाईन भरणे आवश्यक असते. आतापर्यंत दोनदा या कामांसाठी मुदतवाढ देण्यात आले आहे. आतादेखील सर्व शाळांना ३० मेपर्यंत ऑनलाईन माहिती भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. जिल्हा शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व अंशत: अनुदानित, जिल्हा परिषदेशी संलग्न अशा एकूण २ हजार ९०७ शाळा आहेत. त्यापैकी २३१३ शाळांनी यू-डायसवर माहिती भरली आहे. २२९ शाळांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. जवळपास २०० शाळांनी अजूनही कोणतीही माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली नसल्याची अशी शिक्षण विभागाचे सूत्रांनी दिली.
बॉक्स
यू-डायस प्लस माहिती भरणाऱ्या शाळा
अचलपूर तालुक्यात २२३, अमरावती तालुक्यात १३८, महापालिका क्षेत्रात १६७, अंजनगाव सुर्जी तालुक्यात १६०, भातकुली तालुक्यात १२७, चांदूर बाजार तालुक्यात १८३, चांदूर रेल्वे तालुक्यात ९४, चिखलदरा तालुक्यात २२०, दर्यापूर तालुक्यात २२५, धामणगाव रेल्वे तालुक्यात ११६, धारणी तालुक्यात १६९, मोर्शी तालुक्यात १०१, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १२८, तिवसा तालुक्यात ९८ आणि वरूड तालुक्यात १६४ अशा २३१३ शाळांनी यू-डायस प्लसबाबत माहिती दाखल केली आहे.
कोट
जिल्ह्यातील तीन तालुक्यांत डेटा एन्ट्री ऑपरेटरची पदे रिक्त आहेत. त्यामुळे यू-डायसची माहिती भरण्याच्या कामात अडचणी येत आहेत. असे असले तरी वरिष्ठ स्तरांवरून दिलेल्या सूचनांप्रमाणे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती भरण्याचे काम सुरू आहे.
- प्रीती गावंडे, संगणक प्रोग्रामर, सर्व शिक्षा अभियान