चिखलदऱ्याच्या अप्पर प्लेटोत अस्वलाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 12:13 AM2017-06-02T00:13:42+5:302017-06-02T00:13:42+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यातील अप्पर प्लेटोस्थित पॉइन्टवर दिवसा अस्वलाने धुमाकूळ घातला असून

Upper platelet bark of the mud | चिखलदऱ्याच्या अप्पर प्लेटोत अस्वलाचा धुमाकूळ

चिखलदऱ्याच्या अप्पर प्लेटोत अस्वलाचा धुमाकूळ

googlenewsNext

थरार : ठाकूर, प्रास्पेक्ट पॉर्इंटवर पर्यटकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यातील अप्पर प्लेटोस्थित पॉइन्टवर दिवसा अस्वलाने धुमाकूळ घातला असून मोबाईलमध्ये छायाचित्र काढण्याच्या नादात काही फूट अंतरावर पर्यटकांची धावपळ जीवघेणी ठरल्याचे चित्र आहे.
चिखलदरा व परिसरातील जंगलामध्ये अस्वालांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरोज दुपारी ३ वाजता नंतर पर्यटनावरील हरिकेन, ठाकुर, प्रॉस्पेक्ट पाइन्टसह रेंजर कॉलेज परिसरात अस्वल त्यांचे पांच-सहा पिल्ले दिसत असल्याचे चित्र आहे. अस्वल पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह चिखलदरा पर्यटनसाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून काहींची अतिशयोक्ती कृत्य जीवघेणे ठरण्याची शक्यता बळावली आहे.
मोठ्याने ओरडत, दगडांचा मारा
उपरोक्त पॉइन्टवर अस्वलांना पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करण्यासोबत दऱ्या खोऱ्यात लांब दिसणाऱ्या अस्वलांना बघून मोठ्याने ओरडत, त्या दिशेने दगड व मिटकावन्याचे कृत्य काही पर्यटक व स्थानीय अस्वलास पाहण्यासाठी येणारे नागरिक करीत आहे. मंगळवारी हा प्रकार पाहून वनविभाग आणि पोलिसांनी पॉइन्टवरील उपस्थिताना हुसकाहून लावले होते.
मोबाइलने सेल्फीचा
जिवघेणा मोह
वाघा पेक्षा हिस्त्र प्राणी म्हणून अस्वलाची ओळख आहे. मनुष्य दिसताच त्याच्या डोक्यासह तोंडाला तीक्ष्ण नखाने ओरबडून जिवघेणा हल्ला करते. मेळघाटात दरवर्षी किमान वीस ते पंचवीस घटना घडतात, असे असताना अस्वलास पाहण्यासाठी येणारे काही अति उत्साही पर्यटक ‘लोखंडी’ कठड्याखाली उतरून दरीतील अस्वलासोबत मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा जीवघेणा थरार करीत आहे. प्रत्येक पॉइन्टवर असलेले सुरक्षा कठडे ओलांडण्याची सक्त मनाई आहे. अनेक पर्यटकांचा खोऱ्यात पाय घसरून अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, हे विशेष.

Web Title: Upper platelet bark of the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.