कलाकारांच्या हृदयात उर्दू भाषा

By admin | Published: December 27, 2015 12:27 AM2015-12-27T00:27:40+5:302015-12-27T00:27:40+5:30

आयुष्यभर अनेक मुशायऱ्यांचे कार्यक्रम केले. मराठी-हिंदी भाषेप्रमाणेच उर्दू ही भाषा गोड असून ती प्रत्येक कलाकाराच्या हृदयात आहे.

Urdu language in the heart of artists | कलाकारांच्या हृदयात उर्दू भाषा

कलाकारांच्या हृदयात उर्दू भाषा

Next

सलमा आगा : दिलखुलास चर्चेत मनोगत
अमरावती : आयुष्यभर अनेक मुशायऱ्यांचे कार्यक्रम केले. मराठी-हिंदी भाषेप्रमाणेच उर्दू ही भाषा गोड असून ती प्रत्येक कलाकाराच्या हृदयात आहे. मी प्रथमच अंबानगरीत आली असून येथील लोक फार छान आहेत, अशी दिलखुलास चर्चा सुप्रसिध्द गायिका तथा अभिनेत्री सलमा आगा हिने केली. ते येथे आयोजित एका मुशायरा कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आली असता कार्यक्रमापूर्वी मोर्शी मार्गावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत ती बोलत होती. दिल के अरमा आसूओं में बह गये, हे माझ्या जीवनातील सर्वात हीट गीत असल्याचेही तिने मिश्किलपणे सांगितले. माझे शिक्षण व बालपण लंडनमध्ये गेले. तेथेच बीबीसी रेडिओमध्ये नई जिंदगी, नही जीवन या कार्यक्रमापासून आयुष्याची सुरुवात केली. माझे नाना-नानी चित्रपटसृष्टीशी जुळले असल्यानेच त्यांच्याकडून लहानपणीच अभिनयाचे धडे घेतले. भारतात आल्यावर एका कल्पनेने अल्बममध्ये जलवा है गझंल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. सलमा आगा हिने निकाह या सुप्रसिध्द चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखविली. तेवढेच सुरेल गितेही या चित्रपटाला तिने दिली. पती-पत्नीवर कवायत यामध्ये तिने काम केले. आजही मी सुप्रसिध्द गायिका लतादीदींचे गाणे ऐकते. त्यांना परमेश्वराने सुंदर देणं दिली असल्याचेही यावेळी सांगितले. प्रत्येक कलाकार हा जातीपातीच्या व धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून फार दूर असतो. माझ्याप्रमाणेच प्रत्येक कलाकाराला भारतीय श्रोत्यांचे नेहमीच प्रेम मिळाले आहे. माझी ये कैसा निकाह ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. माझे सुपुत्र शहजादा याकीत अली हा अभिनयाचे धडे घेत आहे. यावेळी पत्रपरिषदेला ईरफानभाई, पुरुषोत्तम हरवाणी, मनपाचे शिक्षण सभापती अब्दुल रफीक, सपाचे महासचिव परवेज सिद्दीकी, गीतकार खालीद नैय्यर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Urdu language in the heart of artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.