युरिया मिश्रित पाणी प्यायल्याने १८ शेळ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:15 AM2019-05-27T01:15:21+5:302019-05-27T01:16:00+5:30
युरिया मिश्रित पाणी पिण्यात आल्याने चराईसाठी गेलेल्या १८ शेळ्या दगावल्या. ही घटना तालुक्यातील वघाळ शिवारात रविवारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले. तालुक्यातील वघाळ शविारात वाडेगाव येथील शेतकरी अरुण ईखे यांचे शेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : युरिया मिश्रित पाणी पिण्यात आल्याने चराईसाठी गेलेल्या १८ शेळ्या दगावल्या. ही घटना तालुक्यातील वघाळ शिवारात रविवारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले.
तालुक्यातील वघाळ शविारात वाडेगाव येथील शेतकरी अरुण ईखे यांचे शेत आहे. या शेतात केळबन असल्याने बागेला ठिबक सिंचनाव्दारे युरिया मिश्रित पाणी दिले जात होते. त्याकरिता शेतातील एका टाक्यातील पाण्यात युरिया टाकण्यात आला होता.
रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या शेतशिवारात वाडेगाव येथील वामन ठाकरे हे बकऱ्या चराईसाठी शिवारात गेले होते. दरम्यान इखे यांच्या शेतातील टाक्यात पाणी दिसताच बकºया त्यावर तुटून पडल्या नि तेथून निघाल्या. मात्र ते पाणी युरिया मिश्रित असल्याने शेजारच्या नंदकुमार भड यांच्या शेतात त्यांना अस्वस्थ वाटल्याने १८ बकºया एकापाठोपाठ दगावल्या. यात ठाकरे यांचे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.