पैशांची निकड, गर्दीत शिरण्याशिवाय नाही पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:11+5:302021-05-20T04:14:11+5:30
गेल्या दोन दिवसापासून आपल्या अपंग लहान भावाला घेऊन बाळू रंगराव येवदा येथील महाराष्ट्र बँकेमध्ये घिरट्या घालत आहे. येथील ...
गेल्या दोन दिवसापासून आपल्या अपंग लहान भावाला घेऊन बाळू रंगराव येवदा येथील महाराष्ट्र बँकेमध्ये घिरट्या घालत आहे. येथील बँकेमध्ये तोबा गर्दी पाहून त्या लहान मुलाला रांगेत लागून आत मध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे तो दोन दिवसापासून परत जात आहे .आज बँकेचा अवधी ला एक मिनिट उशीर झाल्याने त्याने येथील बँक मॅनेजर ला पैसे देण्याची विनंती केली .परंतु निर्दई मॅनेजरने अपंग मुलाला पैसे देण्यास नकार दिला लाखो रुपये पगार घेणारे कर्मचारी गरीब अपंग व्यक्तींची काय व्यथा समजणार जर नियमाचे एवढे पालन करतात तर रोज बँकेसमोर तुडुंब गर्दी असलेल्या लोकांवर का नियंत्रण मिळू शकत नाही. 2 वर्षांपासून लोकांची एटीएम कार्ड अद्यापही मिळाले नाही. ह्या कर्मचाऱ्यांची लोकांच्या कामासाठी नियुक्त केली आहे. हे त्यांनी विसरता काम नाही यावेळेस कुठे जाते त्यांची नियमावली दिवसेंदिवस येवदा गावात कोरोनाविषाणू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या गर्दीमुळे तर या गावांमध्ये कोरोनाचा फैलाव होत नाही ना अशी शंका उद्भ भवत आहे . हे बोलके चित्र टिपले आहे. आमचे प्रतिनिधी अनंत बोबडे यांनी