इर्विन रुग्णालयानजीक हातगाडीने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:15 AM2018-04-23T01:15:32+5:302018-04-23T01:15:32+5:30

येथील इर्विन चौकातील एका अंडा विक्रेता आमलेट तयार करीत असताना त्याच्याकडील सिलिंडरच्या पाइपने अचानक पेट घेत घेतला. त्यामुळे हातगाडी लोकांच्या डोळ्यादेखत जळून खाक झाली. ही घटना रविवारी ७.२० वाजता इर्विन रुग्णालयाच्या बंद असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारानजीक घडली.

Urvine hospital sticks to the ponytail | इर्विन रुग्णालयानजीक हातगाडीने घेतला पेट

इर्विन रुग्णालयानजीक हातगाडीने घेतला पेट

Next
ठळक मुद्देवाहतूक ठप्प : सिलिंडरचा स्फोट होण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील इर्विन चौकातील एका अंडा विक्रेता आमलेट तयार करीत असताना त्याच्याकडील सिलिंडरच्या पाइपने अचानक पेट घेत घेतला. त्यामुळे हातगाडी लोकांच्या डोळ्यादेखत जळून खाक झाली. ही घटना रविवारी ७.२० वाजता इर्विन रुग्णालयाच्या बंद असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारानजीक घडली.
सिलिंडरने पेट घेतल्याने त्याच्या स्फोट होण्याच्या भीतीने २० मिनिटापर्यंत या मार्गावरील वाहने पोलिसांनी थांबविली. अग्निशामन दलाने तातडीने या ठिकाणी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. सदर अंड्याची हातगाडी ही सतीश सनके यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. सिलिंडरचा स्फोट होण्याच्या भीतीने इतर विक्रेत्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी सुरक्षित अंतर राखले. आग लागल्याने इर्विन चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
हातगाड्या असुरक्षित
शहरात ठिकठिकाणी फुटपाथवर हातगाड्यांवर आमलेट करण्याच्या व्यवसाय थाटला आहे. या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून कुठलेही पाऊल उचलले जात नाही. अनेक विक्रेते तर घरगुती सिलिंडरचा वापर करतात. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. घरगुती सिलेंडरचा वापर करणांºयावर कारवाई आवश्यक आहे.

Web Title: Urvine hospital sticks to the ponytail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग