चायनीज हातगाड्यांवर अजीनोमोटोचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:36 PM2018-03-11T22:36:37+5:302018-03-11T22:36:37+5:30

येथील पंचवटी चौकातील हातगाड्यांवर चायनीजच्या खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो (टेस्टींग पावडर) मोनोसोडियम ग्लूटामेट) या घातक पदार्थांचे प्रमाण अधिक वापरले जात आहे.

Use of azinomoto on the Chinese Hahn | चायनीज हातगाड्यांवर अजीनोमोटोचा वापर

चायनीज हातगाड्यांवर अजीनोमोटोचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्यास घातक : कर्करोगासारखे आजार बळावण्याची शक्यता

संदीप मानकर।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील पंचवटी चौकातील हातगाड्यांवर चायनीजच्या खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो (टेस्टींग पावडर) मोनोसोडियम ग्लूटामेट) या घातक पदार्थांचे प्रमाण अधिक वापरले जात आहे. हे आरोग्यासाठी घातक असून, पोट व लिव्हरचे विकार वाढले आहे.
पंचवटी चौक, गाडगेनगर परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने तेथे विद्यार्थ्यांची अधिक गर्दी असते. विद्यार्थ्यांसह महिला व नागरिकही या चायनीजचे पदार्थ खाण्यासाठी येथे येतात. त्यामुळे या ठिकाणी ४० ते ५० रूपये प्लेटनुसार चायनीजेचे पदार्थ खाण्यात येतात. सदर चायनीजच्या पदार्थांसोबत नागरिकांना त्याची कल्पनाही नसेल की, यामध्ये चवीसाठी अजीनोमोटोचा वापर करण्यात येत आहे. पण सतत अजिनोमोटोचे सेवन केल्याने स्थुल व लठ्ठपणा तर वाढतेच व यामध्ये पोटाचे व किडनीचेसुद्धा आजार वाढत आहे. तसेच कर्करोगासारखा दुर्धर आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गर्भवती महिला व लहान मुलांना अजिनोमोटो टाकलेले पदार्थ सेवन करणे अतिशय घातक ठरू शकते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
काय आहे अजिनोमोटो?
मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) या नावानेही पदार्थ ओळखला जातो. याला टेस्टिंग पावडर किंवा मसाला मिट म्हणून या पदार्थाला चांगली टेस्ट यावी म्हणून त्याचा इन्डो चायनीजच्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. तसेच विविध हॉटेलमध्ये मटणामध्ये व अंडाकरीतही अजिनोमोटोचा अधिक वापर करण्यात येते. अनेक नागरिक त्याला आवडीने खातात. पण, नागरिकांना मात्र यातून नकळत आजार मोफत मिळत आहेत. हा पदार्थ तांदळासारखा किंवा क्रिस्टलसारखा दिसतो. हा पदार्थ खाद्यपदार्थात अधिक प्रमाणात वापर केल्यास आरोग्याला अतिशय हानीकारक असून लिव्हरचाही आजार बळावतो.


अजिनोमोटो शरीरराला हानीकारक असून, त्याचे सतत पदार्थ खाल्ल्याने भूक वाढते, लठ्ठपणा, स्थुलपणा वाढतो. तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी व कर्करोगासारखे आजारही होऊ शकतात. फास्ट फुडमध्ये अजिनोमोटोचा वापर केला जातो.
- अतुल यादगिरे,
कर्करोगतज्ज्ञ, अमरावती

Web Title: Use of azinomoto on the Chinese Hahn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.