खाण्याचा सोडा वापरा अन् घरीच करा गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:02+5:302021-09-03T04:14:02+5:30
अमरावती : गणेश स्थापना १० सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने मूर्तिकारांकडे गणेशमूर्ती साकारणाऱ्या वेग आला आहे. मात्र, प्लास्टर ऑफ ...
अमरावती : गणेश स्थापना १० सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने मूर्तिकारांकडे गणेशमूर्ती साकारणाऱ्या वेग आला आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या गणेशमूर्ती स्वस्त आणि आर्कषक असल्याने त्या भक्तांच्या पसंतीला उतरतात. मात्र, पीओंपीच्या मूर्तींचे विसर्जनाने पर्यावरणास हानी होते, हे खरे असले तरी आता खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे.
शाडू मातीच्या मूर्ती या पर्यावरणास पूरक आहे. मात्र, त्या साकारण्यासाठी मूर्तिकारांना मोठी कसरत करावी लागते. त्या तुुलनेत पीओपीच्या मूर्ती तयार करणे सोपे आणि वेळेत साकारता येते. त्यामुळे बहुतांश मूर्तिकार हे पीओपीच्या मूर्ती साकारण्यास प्राधान्य देतात. आता पीओपीची मूर्ती विरघळण्याचा प्रश्न सुटला असून, खाण्याचा सोडा वापरून घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणास सहकार्य करता येणार आहे.
-------------------
२४ तासांतच विरघळते मूर्ती
गणेशमूर्ती पीओपी असो वा शाडू माती, यापैकी कोणत्याही प्रकारच्या मूर्तीचे विसर्जन करताना घरीच पाण्यात खाण्याचा सोडा टाकून केल्यास अवघ्या २४ तासात विरघळते, असा मूर्तिकारांचे म्हणणे आहे. लहान मूर्ती सहजतेने विरघळते. पाण्यात खाण्याचा साेडा टाकणे विसरू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. शाडू मातीची मूर्ती असेल, तर केवळ दोन तासांतच विरघळते, असा दावा करण्यात आला आहे.
----------------
शहरात ७० ते ८० मूर्तिकार आहेत. अमरावती येथून परराज्यात गणेशमूर्ती पाठविल्या जातात. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र, यंदा गणेश मंडळांकडून चार फुटांपर्यंत मूर्तींचे बऱ्यापैकी बूकिंग झाले आहे. ६ इंचापासून तर ४ फुटांपर्यंत पीओपी, शाडू मातीच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
- गजानन सोनसळे, मूर्तिकार
----------------
पीओपीच्याच मूर्तींना अधिक पसंती
सन पीओपी मूर्ती शाडू माती
मूर्ती
२०१९ ७५,००० १९७०
२०२० ९२,००० २४५०
२०२१ (अपेक्षित) १,२५००० ४२००
----------------------
असे असावे खाण्याच्या सोड्याचे प्रमाण
मूर्तींची उंची पाण्याचे प्रमाण (लिटरमध्ये) खाण्याचा सोडा (किलोमध्ये)
७ ते १० इंच १२ २
११ ते १४ इंच २० ते २२ ४
१५ ते १८ इंच ५० ६
---------------------
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर....
१) खाण्याच्या सोड्यात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यास ते पर्यावरणपूरक ठरणारे आहे. त्यामुळे घरीच पाण्याच्या सोड्यात गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यास पाणी हे फुलझाडांना खत म्हणून वापरता येते.
२) खाण्याच्या सोड्यात कॅल्शियम कार्बोनेट असल्याने विसर्जनानंतर ते पाणी पर्यावरणासाठी हानिकारक नाही. पिकांसाठीही हे पाणी खतांचा वापर म्हणून हमखास करता येईल.