कोरडवाहू अभियानासाठी समन्वयातून प्रयन्न
By Admin | Published: November 18, 2014 10:48 PM2014-11-18T22:48:14+5:302014-11-18T22:48:14+5:30
जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे
अमरावती : जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे त्या प्रमाणात जिल्हयात प्रगती झाली नव्हती त्यामुळे आता कोरडवाहू अभियान जिल्हयात अधिक प्रभावीपणे आणी यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग आणी शेतकरी यांच्या समन्वयातुन प्रयन्न करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे .
कोरडवाहू अभियान जिल्ह्यात माघारल्याचे वास्तव लोकमतने सोमवारी लोकदरबारात मांडले होते. त्यामुळे आता कोरडवाहू अभियनात कृषी विभागाला जो शेतकऱ्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद लोकसहभागाची अट असल्यामुळे मिळत नाही परिणामी अभियानाच्यासाठी कितीही प्रयन्न केले तरी पाहीजे तो प्रतिसाद मिळत नाही यामुळे या अभियानासाठी शासनाकडून ३ कोटींहून अधिक निधी उपलब्ध असतानाही हा निधी खर्च करण्यास अडचणी आहेत .परंतु मागील वर्षीपेक्षा यंदा कोरडवाहू अभियान यशस्वी करण्याचासाठी कृषी विभाग जोमाने कामाला लागला आहे .यासाठी या अभियानाच्या माध्यमातुन राबविण्यात येणारे जवळपास सहा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. मनुष्यबळ विकास कार्यक्रम, गटसंघटन, सिंचन प्रक्रियेमध्ये तुषार व ठिबक सिंचन, प्राथमिक कृषी प्रक्रिया यांत्रिकीकरण अशा सर्वच उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शेतकरी कसे सहभागी होतील यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणी शेतकरी यांच्या समन्वयातुन आवश्यक ते उपाय योजना करण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे . अमरावती जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानासाठी नऊ तालुक्यांतून १३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र आहे आणि उपाययोजना केल्या तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, असे क्षेत्र नेहमीसाठीच कोरडवाहू राहते. या क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी विविध योजना राबविल्या जातात या योजनाअधिक प्रभावी पणे राबवून त्या यस्ववी करण्यात येणार आहे शासनाकडून ज्या गावांची निवड या अभियानासाठी केली आहे, त्या गावांमध्ये दरवर्षी विविध योजनांवर १ कोटी रुपये खर्च केला जातील. (प्रतिनिधी)