वनविभागाच्या बोधचिन्हाचा वापर चुकीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:18+5:302021-05-28T04:11:18+5:30
प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आदेश : लोकमत इम्पॅक्ट परतवाडा: महाराष्ट्र वन विभागाचे बोधचिन्ह, घोष ...
प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे आदेश
प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आदेश :
लोकमत इम्पॅक्ट
परतवाडा: महाराष्ट्र वन विभागाचे बोधचिन्ह, घोष वाक्य आणि शासनाची राजमुद्रा केवळ शासकीय कार्यालयांना वापरता येईल . राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य तसेच मानद वन्यजीव रक्षक, राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या अशासकीय सदस्यांना, संस्थांना, संस्थानच्या प्रतिनिधींना आणि राज्याच्या मानद वन्यजीव रक्षकांना ते वापरता येणार नाही. असे स्पष्ट निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक( वन्यजीव) महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या २७ मे रोजी च्या पत्राद्वारे निर्गमित केले आहेत.
लेटरहेडवर शासनाची राजमुद्रा, राज्य शासनाच्या वन विभागाचे बोधचिन्ह, घोषवाक्य, मुद्रित करणे, पत्रव्यवहारात वापरणे किंवा तत्सम उपयोग करणे अनुचित ठरते. याचा अनुचित वापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही या पत्रात देण्यात आले आहेत. या अनुषंगाने १५ फेब्रुवारी २०२० च्या शासन परिपत्रकाची आठवणही प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या २७ मे रोजीच्या पत्राद्वारे संबंधितांना करून दिली आहे.
बॉक्स
वनविभागाच्या बोधचिन्हाचा गैरवापर? या मथळ्याखाली लोकमतने २७ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले आहे. हे वृत्त प्रकाशित होताच प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य यांनी याची दखल घेत, वनविभागाचे बोधचिन्ह राज्य वन्यजीव मंडळाच्या अशासकीय सदस्यांना वापरता येत नसल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.तर महाराष्ट्र वनविभागाचे बोधचिन्ह, वन्यजीव मंडळाचे अशासकीय सदस्य, वापरत असल्याची तक्रार २४ मे रोजी आमदार प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.