शासकिय बांधकामात अवैध रेतीचा वापर फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:25+5:302021-04-15T04:12:25+5:30

महसुल अधिकार्‍यांनी बजावली बघ्याची भुमिका धनंजय वांगे- प्रतिनिधी-ब्राह्मणवाडा थडी) रात्री ७.३० चे सुमारा रेती भरलेला ट्रक ब्राम्हणवाडा थडी येथील ...

The use of illegal sand in government construction failed | शासकिय बांधकामात अवैध रेतीचा वापर फसला

शासकिय बांधकामात अवैध रेतीचा वापर फसला

Next

महसुल अधिकार्‍यांनी बजावली बघ्याची भुमिका

धनंजय वांगे- प्रतिनिधी-ब्राह्मणवाडा थडी)

रात्री ७.३० चे सुमारा रेती भरलेला ट्रक ब्राम्हणवाडा थडी येथील बाजार चौकातील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी आणल्या जातो.त्यातील अवैध उत्खनन केलेली सर्व काळी रेती खाली केल्या जाते. त्यानंतर काही वेळाने मंडळ अधिकारी,तलाठी हे महसुलचे अधिकारी शासकिय वाहनाने ब्राम्हणवाड्यात दाखल होतात.रेतीचा साठा बघतात व आल्यापावली परत जातात.या दरम्यान मध्यरात्री ज्या ट्रक मधून रेती आणली त्याच ट्रकमध्ये जेसीबी द्वारे चौकात टाकलेली रेती भरुन नेली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तरी काही प्रमाणात रेती घटनास्थळावरच असते.या सर्व घटनाक्रमात अवैध रेती बाबत मात्र कोणावरही कारवाई होत नाही.यावरुन रेती तस्कराचे हात किती वर पर्यंत पोहोचले आहे याची कल्पना आता ब्राम्हणवाडा थडी ग्रामस्थांनाही आली.

चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील जि.प.शाळेनजीक बाजार चौकाचे क्राँक्रीटीकरणाचे काम ग्रामपंचायतीचेवतीने करण्यात येत आहे.लाखो रुपयाच्या या शासकिय कामात अवैध रेतीचा वापर होत असल्याची बाब या घटनेवरुन ग्रामस्थांच्या लक्षात आली.या चौकातील कामात सुरवातीला मुरुम व दगड टाकण्यात आले.त्यानंतर होणार्‍या सिमेंटच्या कामासाठी रेतीची गरज असते.मात्र तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने शासकिय कामात सध्या माडूच्या रेतीचा वापर करण्यात येत आहे.मात्र कंत्राटदारांना ही रेती आणणे परवडत नसल्याने ते छुप्या मार्गाने अवैध रेतीचा वापर करतात ही बाब ब्राम्हणवाडा थडी मधील घटनेवरुन दिसून येते.

रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास ब्रा.थडी येथील चौकातील काँक्रीटच्या कामासाठी एक ट्रक काळी रेती बांधकामावर टाकण्यात आली.याची भनक महसुल अधिकार्‍यांना लागली.मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकिय वाहनाने घटनास्थळ गाठले.रेतीच्या साठ्याची केवळ पाहणी केली.ती रेती अवैध असतांना या अधिकार्‍यांनी पंचनामा केला नाही.या दरम्यान रातोरात सदर रेतीसाठा हटवाण्यात आला तरी काही प्रमाणात रेती घटनास्थळावर होतीच. घटनेपासून पोलीस पाटील सुध्दा अनभिज्ञ आहे.

बांधकामासाठी आणलेली रेती अवैध नसेल तर महसुलचे अधिकारी शासकिय वाहनाने तेथे पोहोचले कसे?त्यांनी चौकशी का केली नाही?आल्या पावली परतले कसे? व आणलेली रेती इतक्या घाईगडबडीने परत कोणी नेली? तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव नसल्याने नदीपात्रातून वाहतूक केलेली रेती ही अवैधच आहे असे असतांना असा साठा खुद्द महसुल अधिकार्‍यांच्या समक्ष असतांना त्यावर कारवाईसाठी तक्रार कशाला पाहीजे?असे एक ना अनेक अनुत्तरीय प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Web Title: The use of illegal sand in government construction failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.