चिखलदऱ्याच्या आमपाटी प्रकल्पात लाल मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:08 PM2018-10-14T22:08:50+5:302018-10-14T22:09:08+5:30

तालुक्यातील गांगरखेडा येथे मागील सहा वर्षांपासून रखडत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आमपाटी प्रकल्पात अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. काळ्याऐवजी चक्क लाल मातीचा वापर सुरू असल्याने प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची तक्रार करण्यात आली आहे

The use of red clay in the mud cranial plant | चिखलदऱ्याच्या आमपाटी प्रकल्पात लाल मातीचा वापर

चिखलदऱ्याच्या आमपाटी प्रकल्पात लाल मातीचा वापर

Next
ठळक मुद्देनिकृष्ट कामाची तक्रार : अधिकारी ठेकेदाराचे संगनमत

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील गांगरखेडा येथे मागील सहा वर्षांपासून रखडत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आमपाटी प्रकल्पात अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. काळ्याऐवजी चक्क लाल मातीचा वापर सुरू असल्याने प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची तक्रार करण्यात आली आहे
आदिवासींच्या शेतजमिनींवर सुरू असलेल्या गांगरखेडा येथील आमपाटी प्रकल्पाचे काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्या जात असल्याची तक्रार हतरु जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या पुजा राहुल येवले यांनी केली आहे. सदर प्रकल्पात हार्टिंग झोनमध्ये काळी माती न टाकता तेथीलच लाल माती ,मुरूम व दगडाचा वापर करण्यात येत आहे. पाणी टाकून रोलरने दबाई किंवा पिचिंग करणे आवश्यक असताना सर्व नियम धाब्यावर बसविल्या जात आहे.प्रत्येक वेळी तपासणी करणे आवश्यक असताना प्रकल्पाच्या वेस्टवेअर झोनमध्ये वापरण्यात येणारी रेती पांढरी व बारीक असून ती मध्यप्रदेशातून आणली जात आहे. यासंदर्भात तक्रार देऊनही संबंधित अधिकारी कुठल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याने संगनमताने हा अपहार सुरू असल्याची तक्रार विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी कारवाई न केल्यास येवले मंत्रालयात तक्रार करणार आहेत.

आमपाटी प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे आही.संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी. काळ्याऐवजी लाल मातीचा वापर व नियम गुंडाळून काम सुरू असल्याची तक्रार केली.
- पूजा राहुल येवले
जि. प. सदस्य हतरु

प्रयोगशाळेनुसार माती योग्य आह.े अहवाल उशिरा आल्याने जि. प. सदस्यांच्या दोन्ही पत्राची उत्तरे दिली नाही. प्रकल्पस्थळी भेट दिली .काम योग्य प्रकारे सुरू आहे
- सुनील राठी
कार्यकारी अभियंता
पाटबंधारे प्रकल्प

Web Title: The use of red clay in the mud cranial plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.