रेमडेसिविरचा प्रोटोकॉलनुसार वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:01+5:302021-04-18T04:13:01+5:30
अमरावती : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील खासगी कोविड रुग्णालय चालकांची सभा शनिवारी आयोजित करण्यात आली ...
अमरावती : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील खासगी कोविड रुग्णालय चालकांची सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यात रेमडेसिविचा प्रोटोकॉलनुसार वापर करण्याच्या सूचना आयुक्त प्रशांत रोडे यांनी केल्या. यावेळी उपलब्ध यंत्रसामग्री, ऑक्सिजन व औषधी यांचा आढावा घेण्यात आला.
रेमडेसिविरची आवश्यकता असल्यासच रुग्णांचे नातेवाईकांना आणावयास सांगावे. ऑक्सिजनदेखील ज्या रुग्णालयाला आवश्यकता आहे, त्यांना मागणीनुसार पुरविण्यात येत आहे. याचे ऑडिट संबंधित डॉक्टरांनीच करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एचआरसीटी चाचणी करणे रुग्णास बंधनकारक नाही. करायचीच झाल्यास संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार करावी व अशा रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय नॉन कोविड रुग्णालयांनी कोविड पॉझिटिव्ह रुग्णास उपचारासाठी दाखल करू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीला उपायुक्त रवि पवार, सीएस श्यामसुंदर निकम, एमओएच विशाल काळे, पीडीएमएमएसीचे डीन ए. टी. देशमुख, पद्माकर सोमवंशी, आयएमएचे अनिल रोहणकर, संदीप दानखेडे, श्याम राठी, सोहेल बारी, फिरोज खान, विक्रांत राजूरकर आदी डॉक्टर्स उपस्थित होते.